Shivsena Dasra Melava : एक नेता, एक झेंडा, एक मैदान… भगवा अटकेपार फडकणार; शिवसेनेचा टीझर होतोय व्हायरल

Shivsena Dasra Melava : शिंदे गटाचा टिझर
शिंदे गटाकडूनही दसरा मेळाव्याची जोरदार तयारी सुरु आहे. ठाकरे गटाच्या दसरा मेळाव्याच्या टिझरच्या अगोदर शिंदे गटाचा टिझर आणि एक पोस्टर शेअर करण्यात आला आहे. या पोस्टरमध्ये एक नेता, एक पक्ष, एक विचार, एक लव्य, एक नाथ… असं कॅप्शन दिलं आहे. त्याचबरोबर या पोस्टरमध्ये शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे, आनंद दिघे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचाही फोटो पाहायला मिळत आहे.
एक नेता, एक झेंडा, एक मैदान…
शिवसेनेच्या पारंपरिक ऐतिहासिक दसरा मेळाव्याचे साक्षीदार व्हा!
स्थळ : छत्रपती शिवाजी महाराज पार्क (शिवतीर्थ), दादर
५ ऑक्टोबर २०२२, सायं. ६.३० वा. pic.twitter.com/FbulJpw2mA— ShivSena – शिवसेना (@ShivSena) September 30, 2022
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या अधिकृत ट्विटरवर शेअर केलेला हा टिझर “वाजत गाजत, गुलाल उधळत या… पण शिस्तीत या!” असं कॅप्शन देत रिट्विट केला आहे.
वाजत गाजत, गुलाल उधळत या… पण शिस्तीत या! 🚩 https://t.co/KyQWJVymZG
— Office of Uddhav Thackeray (@OfficeofUT) September 30, 2022