‘आर्या’ नंतर अभिनेत्री सुश्मिता सेन पुन्हा एकदा ओटीटी माध्यमासाठी सज्ज | पुढारी

'आर्या' नंतर अभिनेत्री सुश्मिता सेन पुन्हा एकदा ओटीटी माध्यमासाठी सज्ज

पुढारी ऑनलाईन डेस्क : फिटनेस फ्रिक असलेली अभिनेत्री सुश्मिता सेन अनेक कारणांसाठी चर्चेत असते. मोजक्याच सिनेमांमधून सुश्मिताने लक्षवेधी भूमिका साकारल्या आहेत. चंदेरी दुनियेपासून बराच काळ लांब राहिल्यानंतर सुश्मिताने थेट ओटीटी माध्यमावर पदार्पण केलं. आर्या या स्त्री प्रधान वेबसिरीजमधून ती ओटीटी माध्यमात चमकली.  या सिरीजमधली तिची लढाऊ स्त्रीची व्यक्तिरेखा प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेऊन गेली. ‘पेनोजा’ या डच क्राइम सिरिजचा रिमेक असलेली ही सिरीज पतीच्या निधनानंतर सामान्य स्त्रीचा डॉन बनण्यापर्यंतचा प्रवास या सिरिजमध्ये खुबीने उलगडला आहे.

पहिल्या सीझनच्या लोकप्रियतेनंतर निर्मात्यांनी आर्याचा दुसरा सीझनही प्रेक्षकांच्या भेटीला आला. यालाही अर्थातच प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलं नसलं तर नवलच !  या दोन सिरीजच्या यशाची चव चाखल्यानंतर आता सुश्मिता पुन्हा एकदा ओटीटी वर राज्य करण्यासाठी सज्ज झाली आहे. सुश्मिताने सोशल मिडियावर नुकतीच एक पोस्ट शेयर केली आहे. या पोस्टवरुन ती आगामी वेबसिरीजमधून प्रेक्षकांच्या भेटीला येते आहे. आपल्या पोस्टमध्ये सुश्मिता म्हणते, ‘ Sun Set..Sen Rise!!! आयुष्य खूपच व्यस्त झालं आहे. ब्रँड न्यु वेबसिरीजच्या शूटच्या तयारीत.. माझी आगामी लाडकी.. खूप प्रेम..

 

सुश्मिता मध्ये ट्रेंड करत होती ते तिच्या आणि ललित मोदींच्या नात्यामुळे. पण या नात्याची सुरुवात होते ना होते तोच या जोडीच्या ब्रेक अपची चर्चा होऊ लागली. अर्थातच या सगळ्या चर्चेच्या गदारोळात सुश्मिताने कोणतंही भाष्य करण टाळलं आहे.

Back to top button