जळगावात नात्याला काळीमा, बापाकडूनच अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण | पुढारी

जळगावात नात्याला काळीमा, बापाकडूनच अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण

पाचोरा : जळगाव- बाप-बेटीच्या पवित्र नात्याला काळीमा फासणारी घटना पाचोरा तालुक्यात उघडकीस आली आहे. अल्पवयीन मुलीशी अश्लील चाळे करणार्‍या पित्याला पाचोरा पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणी पाचोरा पोलीस ठाण्यात पीडित मुलीच्या आईने तक्रार दाखल केली. यावरुन पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नराधम पित्याने आपल्या १५ वर्षीय मुलीला मोबाईलमध्ये अश्लील व्हिडीओ दाखवायचा तसेच तिच्यासोबत अश्लील चाळे करायचा. हा किळसवाना प्रकार मागील तीन वर्षापासून पासून सुरु होता. नराधम बाप मुलीला तुझ्या आईला घराबाहेर काढून देईल, अशी धमकी द्यायचा. त्यामुळे मुलगी अन्याय सहन करत होती परंतु मागील काही दिवसांपासून प्रकार वाढल्यामुळे पीडीत मुलीने शेवटी आईला सर्व घटना सांगितली. आईने आपल्या भावांना सर्व घटना सांगितली. त्यानंतर मंगळवारी रात्री याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी तत्काळ नराधम बापाला बेड्या ठोकल्या आहेत.

Back to top button