चाहत्यांच्या गराड्यात असलेल्या रणवीर सिंगच्या कानशिलात लगावली जाते तेव्हा…………….. | पुढारी

चाहत्यांच्या गराड्यात असलेल्या रणवीर सिंगच्या कानशिलात लगावली जाते तेव्हा.................

पुढारी ऑनलाईन डेस्क : नेहमी अतरंगी कपडे आणि स्टाईल्सनी चर्चेत असलेला रणवीर सध्या वेगळ्याच कारणाने चर्चेत आहे. रणवीरसोबत झालेल्या प्रकराने सगळेच आश्चर्यचकित झाले. सध्या एका हाताने गाल पकडलेल्या रणवीरचा फोटो वेगाने व्हायरल होत आहेत.  हे फोटो असे आहेत की जसं कोणी रणवीरच्या कानशिलात वाजवली आहे. तुम्हीही असाच विचार करत असाल तर बरोबर आहे. भर गर्दीत चक्क रणवीरच्या कानाखाली वाजवली आहे. बेंगळुरू येथे पार पडलेल्या रेड कार्पेट इव्हेंटमध्ये रणवीरसोबत हा प्रकार घडला आहे. गर्दीत अडकलेल्या आणि गाल चोळत असलेल्या रणवीरचा व्हीडियो व्हायरल होताना दिसतो आहे.

साउथ इंडियन इंटरनॅशनल मुव्ही अवॉर्ड्समध्ये रणवीरने हजेरी लावली होती. या दरम्यान रेड कार्पेटवर तो चाहत्यांच्या गराड्यात सापडला. याच दरम्यान त्याच्या गालावर कुणाची तरी जोरदार चापट बसली. अचानक झालेल्या प्रकाराने रणवीरचा पार चांगलाच चढला. पण अभिनयात निपुण असलेल्या रणवीरने मूड लगेच सावरला. पण रणवीरला कानशिलात मारलेली व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून त्याचा बॉडीगार्डच असल्याच समोर आलं. रणवीरला गर्दीपासून वाचवण्याच्या नादात बॉडीगार्डकडूनच रणवीरच्या कानाखाली वाजवली गेली असली तरी रणवीरचा अॅटीट्यूड मात्र नेहमीप्रमाणेच कूल होता. रणवीर आगामी ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Back to top button