जपानी मुलीने गायलेल्या मराठी गाण्याच्या व्हिडियोला नेटीझन्सचा तुफान प्रतिसाद, तुम्ही पाहिलात का व्हिडियो ? | पुढारी

जपानी मुलीने गायलेल्या मराठी गाण्याच्या व्हिडियोला नेटीझन्सचा तुफान प्रतिसाद, तुम्ही पाहिलात का व्हिडियो ?

पुढारी ऑनलाईन डेस्क : भाषा हे संवादाचं मुख्य माध्यम पाहिलं जात. कोणत्याही व्यक्तीशी जोडलं जाण्यात भाषा महत्वाची भूमिका बजावते. पण यांच्यापलीकडेही माणसांना जोडणारी महत्त्वाची बाब म्हणजे संगीत. तुम्ही कोणत्याही देशाचे, वंशाचे किंवा कोणतीही भाषा बोलणारे असा संगीत तुम्हाला या सगळ्या मर्यादांच्या पलीकडे घेऊन जाते. अगदी हीच बाब मनात ठेवत एका जपानी मुलीचा व्हिडियो व्हायरल होतो आहे.  आता तुम्ही म्हणाल या व्हिडियोत असं काय खास आहे जे नेटिझन्सनी या व्हिडियोला इतकं डोक्यावर घेतलं आहे. ही जपानी मुलगी या व्हिडियोमध्ये चक्क मराठी गाणं गाताना दिसते आहे. गायक , दिग्दर्शक सलील कुलकर्णी यांनी हा व्हिडियो शेअर केला आहे. स्टुडंट एक्स्चेंज प्रोग्रॅममधून भारतात आलेल्या या जपानी मुलीने गणोशोत्सवात हे गाणं गायलं आहे.

चिंटू सिनेमातील सलील कुलकर्णी यांचं’एकटी एकटी घाबरलीस ना’ हे गाणं गाऊन सर्वांना थक्क केलं. विशेष म्हणजे अत्यंत उत्तम उच्चारात तिने हे गाणं सादर केलं. पुण्यातील एका सोसायटीच्या गणेशोत्सवात तिने हे गाणं सादर केल्याचं समोर आलं.  विशेष म्हणजे तिने यावेळी जपानी पद्धतीचा किमोनो घातला होता. तिच्या या मराठीमोळ्या अंदाजाचं नेटीझन्स कौतुक करत आहेत. सलील कुलकर्णी यांनीही हा व्हिडियो शेअर केला आहे. आपल्या पोस्टच्या कॅप्शनमध्ये ते म्हणतात,

‘ Iroha Sue from Japan singing
” एकटी एकटी घाबरलीस ना ?”
संगीत सगळ्या सीमा ओलांडून हृदयापर्यंत पोहोचतं ह्याचं हे उदाहरण पाहून भरून आलं ..
Rotary Exchange Program च्या माध्यमातून पुण्यात आलेली ही मुलगी आणि पुण्यातल्या शीला कोपर्डे ( करिश्मा सोसायटी ) ह्यांनी तिला हे गाणं शिकवलं.’

Back to top button