गुंतवणूक : गुंतवणूकदाराला मनःशांती देणारे फंड | पुढारी

गुंतवणूक : गुंतवणूकदाराला मनःशांती देणारे फंड

भरत साळोखे :  बॅलेन्स्ड अ‍ॅडव्हान्टेज् फंड्स हे संभ्रमित मन:स्थितीत असणार्‍या गुंतवणूकदारांसाठी वरदान ठरणारा फंड प्रकार आहे. कमीत कमी जोखीम घेणार्‍या परंतु बँकेपेक्षा अधिक परतावा मिळवू इच्छिणार्‍या गुंतवणूकदारांसाठी तर तो आदर्श फंड आहे.

रशिया-युक्रेनचा तणाव! रशियाचे युक्रेनवर आक्रमण! शेअर बाजाराचे काय होणार? महिना दर महिना महागाईचे आकडे फुगूनच येत आहेत. त्यांचा बाजारावर काय परिणाम होईल? फेडरल रिझर्व्हने व्याजदरात वाढ केली. रिझर्व्ह बँकेनेही रेपो दरामध्ये वाढ केली. त्यामुळे बाजाराने जोरदार आपटी खाल्‍ली. आणखी किती खाली बाजार जाईल? शेअर बाजार सध्या सर्वोच्च पातळीवर आहे. अशा वेळी गुंतवणूक करणे योग्य होईल का? हे तेच प्रश्‍न आहेत. जे सदैव सर्वसामान्य गुंतवणूकदारांच्या मेंदूचा भुगा करत असतात. शेअर मार्केटमधून Exit कधी घ्यायची हे गुंतवणूकदार क्षणात ठरवतो आणि अत्यंत चुकीच्या वेळी झटकन बाहेर पडतो. परंतु बाजारात किंवा म्युच्युअल फंडामध्ये Entry कधी घ्यावी, याचा निर्णय महिनोन् महिने त्याला घेता येत नाही.

गुंतवणूकदारांच्या याच मानसिकतेवर सेबीने एक जालिम मात्रा शोधून काढली आहे. म्युच्युअल फंडांच्या वर्गीकरणामध्ये हायब्रीड स्कीम्स या वर्गामध्ये खालील सहा प्रकारचे हायब्रीड फंड आहेत.
1) Conservative Hybrid Funds
2) Balanced Hybrid Funds
3) Aggressive Hybrid Fund
4) Dynamic Asset Allocation Or Balanced Advantage Funds
5) Arbitrage Fund
6) Equity Savings Funds
वरील सहा उपप्रकारांपैकी चौथा Dynamic Asset Allocation किंवाBalancded Advantage Funds हा जो प्रकार आहे, तो संभ्रमित मन:स्थितीत असणार्‍या गुंतवणूकदारांसाठी वरदान ठरणारा फंडप्रकार आहे. कमीत कमी जोखीम घेणार्‍या; परंतु बँकेपेक्षा अधिक परतावा मिळवू इच्छिणार्‍या गुंतवणूकदारांसाठी तर तो आदर्श फंड आहे. कारण जागतिक अर्थव्यवस्था, देशांतर्गत अर्थव्यवस्था, जगातील भू-राजकीय स्थिती, महागाई इत्यादी बाजारावर परिणाम करणार्‍या सर्व घटकांचा अभ्यास करून फंडामधील इक्‍विटीचे प्रमाण आणि डेटचे प्रमाण किती ठेवायचे, याचे वेळोवेळी निर्णय फंडाचे तज्ज्ञ फंड मॅनेजर वेळोवेळी घेत असतात कारण सेबीने या प्रकारच्या फंडामध्ये इक्‍विटी आणि डेटचे प्रमाण ठरविण्याचे संपूर्ण स्वातंत्र्य फंड मॅनेजरला बहाल केले आहे. प्रत्येक फंड मॅनेजर काही टेक्निकल रेशोंची मदत घेऊन (उदा. पीई रेशो, पीपी रेशो वगैरे) ते प्रमाण ठरवत असतो.

या फंडाची लोकप्रियता इतकी आहे की, ऑगस्ट 2021 मध्येSBI Mutual Fund ते त्यांचा SBI Balanced Advantage फंडाचा NFO बाजारात आणला, तेव्हा त्यामध्ये 15000 कोटी रु. इतके प्रचंडSubscription झाले. जुलै 2022 च्या Amfi च्या आकडेवारीनुसार, जुलै 2022 अखेर भारतातील म्युच्युअल फंडांचा एकूण Aum आकडा आहे. जवळपास साडेसदतीस लाख कोटी आणि यापैकी 186630 कोटी रु.Balanced Advanced फंडामध्ये आहेत. शिवाय दरमहा या फंडामधील गुंतवणुकीचे प्रमाण वाढतच आहे.

वर सांगितल्याप्रमाणे Balanced Advanced किंवा Dynamic Asset Allocation फंडामध्ये इक्‍विटी आणि डेटचे प्रमाण ठरविण्याचे संपूर्ण स्वातंत्र्य फंड मॅनेजरला असते. प्रत्येक फंड मॅनेजरची गुंतवणूक शैलेही त्याची प्रवृत्ती आणि अ‍ॅसेट मॅनेजमेंट कंपनीचा लौकिक यावर ठरत असते. सध्या गुंतवणूक विश्‍वात तीन Strategies प्रचलित आहेत. त्या खालीलप्रमाणे.
1) Pro Cyclical  यामध्ये बाजार उच्च पातळीवर असला तरी खरेदी केली जाते आणि बाजार अधिक वर गेला की, विक्री केली जाते.
2) Counter Cyclical उच्च पातळीवर विक्री केली जाते आणि बाजार खाली येऊ लागला की, हळूहळू खरेदी केली जाते.
3) तिसरा प्रकार अधिक Aggressive असतो. यामध्ये बाजाराचे Valuation न बघता संधी असेल. त्या स्टॉक्समध्ये आक्रमक खरेदी केली जाते.
या Strategies नुसार फंडाचे इक्‍विटीमधील प्रमाण 30 टक्क्यांपासून 65 टक्क्यांपर्यंत केलेले आपल्याला दिसून येते. बाजाराच्या स्थितीनुसार, या फंडामधील इक्‍विटीचे प्रमाण ठरत असल्यामुळे हे फंड अतिशय सावध फंड असतात. अगदी अलीकडचे उदाहरण घ्यायचे, तर ऑक्टोबर 2021 ते जानेवारी 2022 या काळामध्ये BSE Sensex  सात टक्क्यांनी पडला. परंतु Balanced Advanced फंड तीन टक्क्यांपेक्षाही कमी पडले.
हे फंड लोकप्रिय होण्याचे आणखी एक कारण म्हणजे यांना लागू होणारे इक्‍विटी फंडाचे टॅक्सेशन. एक वर्षाच्या पुढील गुंतवणुकीला Indexation चा लाभ मिळत असल्यामुळे हे फंड Tax frendly आहेत. HDFC Balanced Advantage फंड हा या कॅटॅगरीमधील सर्वाधिक मोठा फंड आहे. आजमितीस 21 फंड या प्रकारामध्ये कार्यरत आहेत. काही प्रमुख फंड खालीलप्रमाणे आहेत.

 

क्र.           फंडाचे नाव                            AUM (कोटी रु.)           इक्‍विटीचे प्रमाण       3 वर्षे परतावा      5 वर्षे परतावा

 

1 .       HDFC Balanced Advanced          46130                           69.7%                    17.94                 12.31

2 .            IUU Prudential                        41742                          42.48%                   13.58                10.08

3.   Kotak Balanced Advanced                14157                            53.68                    12.02                  –

4.      Edelweiss Balanced                         8457                             66.21                   15.92                 10.94

5.      ABSL Balanced Advanced                 6861                             54.9                    12.46                   8.2

6.    Nippon India Balanced Advanced       6417                           53.79                     12.1                  8.54
7.    Tata Balanced Advanced                      5466                           50.26                    13.46                   –

Back to top button