मुंबई महापालिका निवडणुक : काँग्रेसचे मुंबईत एकला चलो रे! | पुढारी

मुंबई महापालिका निवडणुक : काँग्रेसचे मुंबईत एकला चलो रे!

मुंबई ; पुढारी वृत्तसेवा : आज जरी काँग्रेस महानगरपालिकेत विरोधी पक्षात असली तरीही आगामी मुंबई महापालिका निवडणुक काँग्रेस 227 स्वतंत्र्य जागा लढवणार आणि काँग्रेसचा तिरंगा महानगरपालिकेवर फडकावणार,असा विश्वास मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांनी व्यक्त केला.

प्रजा फाउंडेशनने घोषित केलेल्या सर्वश्रेष्ठ 10 नगरसेवकांमध्ये अव्वल स्थान मिळवल्याबद्दल काँग्रेसच्या तीन नगरसेवकांचा सत्कार करण्यात आला. त्यावेळी जगताप बोलत होते.

महापालिकेत आमचे संख्याबळ कमी असूनही शिवसेना व भाजप दोन पक्षांच्या नगरसेवकांपेक्षा आमच्या नगरसेवकांचा स्ट्राईक रेट सरस आहे. असा दावा त्यांनी केला. मागील 6 ते 7 महिन्यांमध्ये जेवढे मुद्दे, जेवढे प्रश्न काँग्रेसने उचलून धरले, काँग्रेसच्या नगरसेवकांनी उचलून धरले, तेवढे कुणीही उचलून धरले नाहीत,असेही ते म्हणाले.

मुंबई महापालिका निवडणुक

आज जे यश मिळाले आहे. तसेच यश आगामी निवडणुकांमध्ये सुद्धा काँग्रेस पक्षाला मिळेल,असा विश्वास शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी व्यक्त केला. मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी महानगरपालिका निवडणुका तोंडावर प्रत्येक नगरसेवकाला ग्राउंड लेव्हलला येऊन काम करावे लागेल,अशी सूचना केली.

सर्वश्रेष्ठ 10 नगरसेवकांमध्ये स्थान मिळविल्याबद्दल मुंबई महापालिका विरोधी पक्षनेते रवी राजा आणि काँग्रेसचे नगरसेवक वीरेंद्र चौधरी व नगरसेविका मेहर मोहसीन हैदर यांचा मुंबई काँग्रेसतर्फे जगताप व कार्याध्यक्ष चरणसिंग सप्रा यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला होता. छायाचित्रात शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड आणि मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेखदेखील दिसत आहेत.

Back to top button