Ganeshotsav Pushpa Idols : गणपती बाप्‍पा ‘पुष्‍पा राज’च्‍या रुपात! | पुढारी

Ganeshotsav Pushpa Idols : गणपती बाप्‍पा 'पुष्‍पा राज'च्‍या रुपात!

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : देशभरात सर्वत्र गणेशाचे जल्‍लोषात आगमन होत आहे. हर्षोल्‍हासाचा हा उत्‍सव आजपासून सुरु होत आहे. या उत्‍सवात वेगवेगळ्या रुपातील गणेशाची मूर्तींंचे आपल्‍या दर्शन घडते. दाक्षिणात्‍य सूपरहिट चित्रपट ‘पुष्‍पा: द राइज’ ची क्रेझ आजही कायम आहे. ( Ganeshotsav Pushpa Idols) त्‍यामुळे यंदा गणपती बाप्‍पा ‘पुष्‍पा राज’च्‍या रुपातातील मूर्तीलाही भाविक पसंती देत आहेत. याबाबतचा एक व्‍हिडिओ सोशल मीडियावर व्‍हायरल झाला आहे.

Ganeshotsav Pushpa Idols : ‘अबकी बार पुष्पा राज अवतार’

एक व्‍हिडिओ सोशल मीडियावर व्‍हायरल झाला असून, यामध्‍ये ‘पुष्‍पा’ स्‍टाईलमधील गणपती बाप्‍पांची मूर्ती दिसते. गणेशोत्‍सवात गणपतीच्‍या विविध रुपातील मूर्तींचे भाविकांचे मुख्‍य आकर्षण ठरते. यंदा दाक्षिणात्‍य चित्रपट ‘पुष्‍पा: द राइज’चा फीवर कायम आहे. या चित्रपटातील अभिनेता अल्‍लू अर्जुनची  डान्‍स स्‍टाईल, दाढीवरुन हात फिरवत ‘मैं झ्रुकेगा नही…’ या डायलॉगची क्रेझ आजही कायम आहे.

‘पुष्‍पा राज’च्‍या रुपात गणपती मूर्तींना भाविकांची पसंती मिळत असल्‍याचे व्‍हायरल व्‍हिडिओमध्‍ये दिसते. एक व्‍हिडिओ सोशल मीडियावर शेअर झाला आहे. यामध्‍ये ही मूर्ती दिसते. काही तासांमध्‍ये हा व्‍हिडिओ मोठ्या प्रमाणावर शेअर झाला आहे. तसेच नेटकरी यावर उत्‍स्‍फूर्त प्रतिक्रियावर देत आहेत. एकाने म्‍हटलं आहे, ‘अबकी बार पुष्पा राज अवतार.’

 

 

Back to top button