क्युबात 30 चोरांनी चोरले तब्बल 133 टन चिकन!

क्युबात 30 चोरांनी चोरले तब्बल 133 टन चिकन!
Published on
Updated on

हवाना : क्युबा देशात आश्चर्याचा धक्का देणारी एक अजब घटना उघडकीस आली असून, राजधानी हवाना येथे 30 चोरांनी 133 टन चिकनची चोरी व विक्री केली आणि मिळालेल्या पैशातून चक्क फ्रीज, लॅपटॉप, टीव्ही व एअर कंडिशनर सेटची वारेमाप खरेदी केली. शुक्रवारी रात्री चोरट्यांनी हवानामधील एका चिकन साठ्यावर डल्ला मारला. कम्युनिस्टकडून संचलित रेशन प्रणालीनुसार, या चिकनचे वितरण होणार होते. क्युबामधील या प्रणालीनुसार सध्याही सबसिडीत अन्नपुरवठा केला जातो आणि क्युबामध्ये दैनंदिन जीवनातील हा महत्त्वाचा घटकच ठरत आला आहे.

सरकारी खाद्य वितरक कॉपमारचे निर्देशक रिगोबर्टो मस्टेलियर यांनी चोरी केलेले चिकन हे मध्यम आकाराच्या प्रांतासाठी महिनाभर सहज पुरेसे ठरू शकेल, इतक्या प्रमाणात होते, असे यावेळी सांगितले. आर्थिक संकटमय परिस्थितीमुळे चिकनच्या उपलब्धतेत मुळातच तुटवडा आहे. त्यातच या चोरीच्या घटनेमुळे आणखी चिंतेची स्थिती निर्माण झाली आहे.

ही चोरी मध्यरात्री 2 च्या आसपास झाली असावी, असा अंदाज सरकारी अधिकार्‍यांनी व्यक्त केला असून, चोरट्यांनी कोल्ड स्टोरेजमधील तापमानातील बदल पाहत ही चोरी केल्याचे सीसीटीव्ही फुटेजवरून दिसून आले. 30 चोरांनी 133 टन चिकन घेऊन पलायन करत असताना सुरक्षा यंत्रणा नेमकी काय करत होती, असा प्रश्नही यावेळी उपस्थित केला गेला आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news