जळगाव : शिवसेनेच्या ३ पदाधिकाऱ्यांनी माझ्यावर हल्ला केला : रोहिणी खडसेंचा आरोप

जळगाव : शिवसेनेच्या ३ पदाधिकाऱ्यांनी माझ्यावर हल्ला केला : रोहिणी खडसेंचा आरोप
Published on
Updated on

जळगाव, पुढारी वृत्तसेवा

बोदवड नगरपंचायतीपासून सुरू झालेल्या वादातून शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी माझ्‍यावर हल्‍ला केला, असा खळबळजनक आरोप एकनाथ खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे यांनी पत्रकार परिषदेत केला.

जिल्हा बँकेच्या माजी अध्यक्षा व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे यांनी त्यांच्यावर झालेल्या हल्ल्याप्रकरणाची माहिती देण्यासाठी पत्रकार परिषदेचे आयेाजन केले होते. या वेळी  त्या म्हणाल्या, मी सोमवारी २७ डिसेंबर रोजी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास मानेगाववरून मुक्ताईनगरकडे (एमएच १९ सीसी-१९१९) या क्रमांकाच्या कारने येत होते. त्यावेळी अचानक आपल्या कारवर अज्ञात हल्लेखोरांनी हल्ला केला.

हल्ला करणाऱ्या सात व्यक्ती तीन दुचाकीवरून आल्या होत्या. त्यापैकी तीनजण शिवसेनेचे पदाधिकारी होते. शिवसेनेचे विधानसभा क्षेत्र प्रमुख सुनील पाटील, तालुका अध्यक्ष छोटूभाई चांगदेव आणि ग्रामपंचायत सदस्य पंकज कोळी या तिघांचा हल्ल्यात समावेश हाेता, असेही त्‍यांनी सांगितले.

हल्ला करणाऱ्या एकाच्या हातात पिस्तूल, एकाच्या हातात तलवार तर तिसऱ्याच्या हातात लोखंडी रॉड होता. त्यातील एकाने आमच्या कारच्या बाजूने येत माझ्यावर पिस्तूल रोखले व कारचा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला.  दरवाजा उघडला नाही म्हणून हातात रॉड असलेल्या व्यक्तीने काचेवर जोराने हल्ला चढविला. हा हल्ला मला घाबरविण्यासाठी होता. मात्र मी घाबरणारी नाही. हल्ला केल्यानंतर थोड्या वेळात संशयित हल्लेखोर घटनास्थळाहून पसार झाले. दरम्यान, बोदवड नगरपंचायतीपासून सुरू झालेल्या वादातून शिवसेनेच्या पदाधिकार्‍यांनी हा हल्ला केला असल्याच आरोप रोहिणी खडसे – खेवलकर यांनी केला आहे. याप्रकरणी मुक्ताईनगर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news