नागपूर, पुढारी वृत्तसेवा : आशियाई गेम्समध्ये नागपूरच्या ओजस देवतळे (Ojas Deotale) याने पुरुषांच्या वैयक्तिक कंपाऊंड या प्रकारात अंतिम सामना खेळत गोल्ड मेडल जिंकले आहे. ओजसने आशियाई गेम्समध्ये तीन गोल्ड मेडल मिळवत इतिहास घडवला आहे.
आशियाई गेम्समध्ये नागपूरच्या ओजस देवतळे (Ojas Deotale) याने आर्चरी मिक्स टीम कपांऊंड इव्हेंटमध्ये देखील भारताला सुवर्णपदक मिळवून दिले. आता आर्चरी मेन्स कंपाऊंड टीम इव्हेंटमध्ये सुद्धा भारताला सुवर्णपदक मिळवून दिले आहे. ओजस जगातील तिरंदाजी क्रमवारीत अव्वलस्थानी असलेला आंतरराष्ट्रीय तिरंदाज आहे. गोल्ड मेडल पटकावल्याने ओजसच्या कुटुंबियांनी नागपुरात जल्लोष साजरा केला. ही देश, नागपूरसाठी आणि कुटुंबियांसाठी गौरवाची बाब असल्याचे कुटुंबियांनी म्हटले आहे.
ओजसचे वडील प्रवीण देवतळे, ओजसची आई अर्चना देवतळे यांनी आनंद व्यक्त केला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ओजसच्या कुटुंबातील सदस्यांचे कालच अभिनंदन केले आहे.
हेही वाचा