Morning Exercise : व्‍यायाम (Exercise) रिकाम्या पोटी करावा का? जाणून घ्‍या फायदे आणि तोटेही

Morning Exercise : व्‍यायाम (Exercise) रिकाम्या पोटी करावा का? जाणून घ्‍या फायदे आणि तोटेही

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : व्‍यायाम हे तीन शब्‍द जर म्‍हटलं की निरोगी आरोग्‍याचे चित्र डोळ्यासमोर उभे राहते. वयोगट कोणताही असो निरोगी शरीरासाठी व्‍यायाम (Morning Exercise) हा आपल्‍या जगण्‍यातील आहारा इतकाच महत्‍वाचा असल्‍याचे स्‍पष्‍ट होते. त्‍यामुळे नियमित व्‍यायाम ही निरोगी जगण्‍याची गुरुकिल्‍लीच ठरते. दिवसभरात व्‍यायाम तुम्‍ही कोणत्‍याही वेळी करु शकता, म्‍हणचे सकाळी किंवा सायंकाळी. मात्र, व्यायाम हा शक्यतो रिकाम्या पोटी करावा, असे अलिखित निर्देश आहे. तर अनेकांच्‍या मनात प्रश्‍न असतो की व्‍यायाम हा रिकाम्या पोटीच का करावा, तर आज जाणून घेऊया रिकाम्या पोटी व्‍यायाम केल्‍याचे फायदे आणि तोटेही…

Morning Exercise काय आहेत फायदे ?

चरबी कमी होण्यास मदत

वैद्‍यकीय शास्‍त्रातील तज्‍ज्ञांच्‍या मते, उपाशी पोटी व्‍यायाम केल्‍याचे काही फायदे आहेत. यामध्‍ये वाढलेली चरबी कमी होण्‍यास मदत होते. तुमचे वाढलेले वजन कमी होण्‍यास मदत होते.

स्‍नायूंना मिळते बळकटी
उपाशी पोटी व्‍यायाम केल्‍याने स्‍नायूंना बळकटी मिळते. तसेच शरीराची सहनशीलताही वाढते.

आजारपणापासून राहता दूर

तुम्‍ही जर रिकाम्या पोटी व्‍यायाम करत असाल तर तुम्‍ही एक निरोगी जीवन जगू शकता. जे नियमित व्‍यायाम करतात ते आजारपणापासून दूर राहतात. जे व्‍यायाम टाळतात त्‍यांच्‍या तुलनेने नियमित व्‍यायाम करणारे आजारपणापासून दूर राहतात.

प्रतिकारशक्‍ती वाढते

तुम्‍ही दररोज रिकाम्या पोटी व्‍यायाम करत असाल तर तुमची रोग प्रतिकारक शक्‍ती वाढते. शरीराचे सर्व अवयवामध्‍ये उर्जा निर्माण होते. एकूणच तुमच्‍या जगण्‍यात एक प्रकारचा उत्‍साह निर्माण होतो.

रिकाम्या पोटी व्‍यायाम केल्‍याने होणारे नुकसान

आपण रिकाम्या पोटी व्‍यायाम केल्‍याने होणारे फायदे पाहिले. मात्र, यामुळे शरीराला नुकसानही होते असे वैद्‍यकीय संशोधनाने सिद्‍ध झाले आहे. नुकसान काय होते ते पाहूया…

व्‍यायामामुळे निर्माण होणार्‍या घामामुळे शरीरातील पाणी कमी होण्‍याचा धोका असतो. तसेच उलटी होण्‍याचाही धोका असतो. शरीररातील पाणी पातळी कमी झाल्‍याने भीतीही वाटू लागते. तसेच स्नायूंना दुखापत होण्‍याचा धोकाही वाढतो.

व्‍यायाम करण्‍यापूर्वी नेमकं काय करावं?

रिकाम्या पोटी व्‍यायाम टाळण्‍यासाठी तुम्‍ही कोमट पाण्‍यात लिंबू पिळून त्‍याचे सेवन करू शकता. तसेच फळांचा रस ही घेऊ शकता. तसेच डिहायड्रेशन टाळण्‍यासाठी तुम्‍ही डिटॉक्‍स ड्रिंक घेऊ शकता.

#EmptyStomachWorkoutGoodorBad, #Stomach #Workout

हे ही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news