जागतिक व्याघ्रदिन: ‘हे दुटप्पी वागणं बरं नव्हं’; आमदार मिटकरींची फडणवीसांवर मिश्किल टिका | पुढारी

जागतिक व्याघ्रदिन: 'हे दुटप्पी वागणं बरं नव्हं'; आमदार मिटकरींची फडणवीसांवर मिश्किल टिका

पुढारी ऑनलईन: राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिवसानिमित्त त्यांच्या ट्विटरवरून एक ट्विट केले आहे. यावरून आमदार अमोल मिटकरी फडणवीसांना म्हणतात, “हे दुटप्पी वागणं बरं नव्ह! देवेंद्रजी एकीकडे व्याघ्र संवर्धन बाबत बोलायचे दुसरीकडे आरे वर कुऱ्हाडी चालवायच्या? व्वा!जनतेला सगळं कळतं हे दुटप्पी धंदे बंद करा, असे म्हणत मिटकरींनी उपमुख्यमंत्र्यांच्या कृती आणि विचारावरच प्रश्नचिन्ह केले आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, निसर्गाचा समतोल राखण्यासाठी व्याघ्रसंवर्धन ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. नैसर्गिक अधिवास आणि परिसंस्थेतील सामंजस्य राखण्यासाठी वाघांचे संवर्धन करणे अत्यंत आवश्यक असल्याचेही ते म्हणतात. आणि एका बाजूला जैवविविधतेने समृद्ध आणि बिबट्यांची संख्या अधिक असलेल्या आरेवर कुऱ्हाडी चालवतात. यावरच आ. अमोल मिटकरींनी फडणवीससाहेब हे ‘दुटप्पी वागणं बरं नव्हं’ असे म्हणत स्वत:ची भूमिका मांडली आहे.

अमोल मिटकरी यांनी फडणवीसांवर टिका करताना म्हटले आहे, शिंदे-फडणवीस सरकारने महाविकास आघाडी सरकारचा आरेतील कार शेडचा निर्णय बदलून मेट्रो कार शेड उभारण्याचा निर्णय पक्का केला आहे. परंतु, आरेमध्ये (Aarey) मोठ्या प्रमाणात जैवविविधता आहे. कालच आरेमध्ये केलटी पाड्यात (Kelti Pada) एका घराच्या दारात बिबट्याचं (Leopard) दर्शन झालं आहे. सध्या त्याचा व्हिडिओ सोशल मीडियामध्ये झपाट्याने शेअर होत आहे. आरेमध्ये लेपर्ड ट्रॅपिंगमध्ये सध्या 9 पेक्षा अधिक बिबटे असल्याची माहिती समोर आली होती. त्यापैकी 5 बिबट्यांचा वावर हा आरे कारशेड जवळ असलेल्या भागात असल्याची माहिती समोर आली आहे. आणि देवेंद्रजी जागतिक व्याघ्र दिनाच्या शुभेच्छा देत आहेत वा वा.. अशी मिश्कील टीकाही अमोल मिटकरी यांनी केली आहे.

जागतिक व्याघ्रदिनाच्या शुभेच्छातून राजकीय टोला

“मै शेर हू तो कोई ना कोई शिकार करेगा ! पर शिकार करनेसे पहले हजार बार डरेगा ll” जागतिक व्याघ्र दिनाच्या शुभेच्छा! वाघ जगवणे काळाची गरज आहे वाघ जगले नाहीत तर “भुंकणाऱ्यांची” संख्या जास्त वाढेल.#जागतिकव्याघ्रदिन

Back to top button