पुणे : भाड्यावरून अ‍ॅम्बुलन्स चालकाच्या खुनाचा प्रयत्न

File Photo
File Photo

पुणे : पुढारी वृत्तसेवा : ससून हॉस्पिटल  परिसरात अ‍ॅम्बुलन्स चालविण्याचा व्यवसाय करणार्‍याला दहशत करतो तसेच आमचे भाडे घेतो असे म्हणत त्याला शिवीगाळ करून चहाचे भांडे डोक्यात घालून व कटरने वार करून खुनाचा प्रयत्न केल्याची घटना ससुन रूग्णालयासमोरील रस्त्यावर घडली. याप्रकरणी बंडगार्डन पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.

किरण विठ्ठल राजपुरे आणि निखील ज्ञानदेव राजपुरे (दोघेही रा. तुकाई दर्शन, काळेपडळ, हडपसर) अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. आरोपींनी केलेल्या खुनी हल्ल्यात रणजीत रामचंद्र जानकर (30, रा. मांजरी, पाटील हाऊस, ता. हवेली, जि. पुणे) जखमी झाले. त्यांनी बंडगार्डन पोलिस ठाण्यात याबद्दल फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी रणजीत जानकर आणि संशयीत आरोपी हे अ‍ॅम्बुलन्स चालक असून एकमेकांच्या ओळखीचे आहेत. ते ससुन रूग्णालयाच्या परिसरात अ‍ॅम्बुलन्स चालविण्याचा व्यावसाय करतात. बुधवारी (दि. 13) दुपारी पावणे तीन वाजण्याच्या सुमारास जानकर आणि किरण तसेच निखील ससुन रूग्णालयाच्या परिसरात भाड्याची वाट पाहत थांबले होते.

त्यावेळी दोघेही संशयित आरोपी जानकर यांच्याजवळ गेले. तू खुप दहशत करतो, आमचे भाडे घेतो व आम्हाला मारहाण करतो आज तुला सोडणार नाही म्हणत जवळच असलेल्या टपरीवरील चहाचे भांडे जानकर यांच्या डोक्यात मारले तसेच जवळ असलेल्या प्लॅस्टीकच्या कटरने देखील पाचे ते सहा वेळा वार करून खुनाचा प्रयत्न केला. पुढील तपास बंडगार्डन पोलिस करत आहेत.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news