पुढारी ऑनलाईन : Audi चे नवीन व्हर्जन असलेली Audi A8 L लक्झरी सेडान ही फोर व्हीलर आज भारतीय बाजारात लॉन्च होत आहे. जर्मनमेड असलेल्या या कार फ्लॅगशिप सेडानची किंमत सुमारे1.5 कोटी रुपये (एक्स-शोरूम) असणार आहे. ही कार भारतातील ब्रँडच्या सेडान लाइनअपमध्ये असलेल्या मर्सिडीज-बेंझ एस-क्लास, बीएमडब्ल्यू 7 का सारख्या इतर कारशी थेट स्पर्धा करणार आहे.
लूक, वैशिष्ट्ये
Audi A8 L या 4-सीटर सेडान कारमध्ये आतून आणि तिच्या बाहेरील लुकमध्ये अनेक महत्त्वपूर्ण बदल पहायला मिळणार आहेत. कारच्या पुढील बाजूस एक मोठी लोखंडी जाळी आहे. जी नवीन शैलीतील मॅट्रिक्स एलईडी लाइट्स आणि दोन्ही बाजूंना स्लीक एलईडी लाइट बार्सने जोडलेली आहे. याचा फ्रंट बंपर देखील अपडेट करण्यात आला आहे. आतील बाजूस असलेली इन्फोटेनमेंट स्क्रीन अपडेट केली आहे. तर फोल्डिंग सेंटर कन्सोल टेबल आणि कूलर सुविधादेखील देण्यात आली आहे.
ऑडीच्या A8 L या मॉडेलमध्ये व्हर्च्युअल कॉकपिट, इन्फोटेनमेंटसाठी MIB3 ऑपरेटिंग सिस्टम आणि डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, कनेक्टेड-कार टेक, रिक्लिनर आणि फूट मसाजरसह रियर रिलॅक्सेशन असे हटके पॅकेज देण्यात आले आहे. यामध्ये 3 लिटर TFSI पेट्रोल इंजिन मिळते. हे 48V सौम्य-हायब्रीड सिस्टम आणि क्वाट्रो ऑल-व्हील-ड्राइव्ह तंत्रज्ञानाशी जुळलेले आहे. हे इंजिन 340 एचपी पॉवर आणि 540 एनएम टॉर्क जनरेट करते. इतर मॉडेलच्या तुलनेत Audi A8 L मध्ये ड्राइव्ह डायनॅमिक्स आणि एअर सस्पेन्शन सेट-अपमध्ये मोठ्या प्रमाणात सुधारणा केली आहे.
नवीन Audi A8 L चे बुकिंग मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून सुरु झाले आहे. कंपनी 10 लाख रुपयांच्या टोकन रकमेसह Audi A8 L या लक्झरी सेडानची बुकिंग करत आहे.