दोषींची ‘वर्दी’ उतरवत नाही, तोवर मुलाच्या रक्‍ताचे डाग धुणार नाही! | पुढारी

दोषींची ‘वर्दी’ उतरवत नाही, तोवर मुलाच्या रक्‍ताचे डाग धुणार नाही!

चंदीगड : वृत्तसंस्था :  पंजाबमधील ज्येष्ठ आयएएस अधिकारी संजय पोपली यांचा मुलगा कार्तिक (26) याचा गोळीबारात मृत्यू झाला. घटना घडली तेव्हा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) तपासातील कामकाज म्हणून पोपली यांच्या घरावर छापा टाकलेला होता. कुटुंबाचे म्हणणे आहे की, कार्तिकवर ‘एसीबी’च्या पोलिसांनी गोळी झाडली. दुसरीकडे कार्तिकने स्वत:च स्वत:वर गोळी झाडल्याचे चंदीगडचे पोलिस अधीक्षक कुलदीप चहल यांचे म्हणणे आहे.

पती अटकेत आणि त्यात एकुलत्या मुलाच्या मृत्यूने खचलेल्या या मातेने जोवर छापा टाकायला आलेल्या प्रत्येक पोलिसाची ‘वर्दी’ उतरवणार नाही, तोवर मुलाच्या रक्‍ताचे डाग धुणार नाही, असा आक्रोश चालविला आहे. पथकातील अधिकार्‍यांशी कार्तिकने वाद घातला. कार्तिकवर एकाने पिस्तूल झाडले, असा या मातेचा आरोप आहे.

पोपलींना अटक
संजय पोपली पंजाब सरकारमध्ये निवृत्तीवेतन संचालक होते. सिवरेज बोर्डावर असताना 7.3 कोटी रुपयांच्या एका प्रकल्पात पोपली यांनी

1 टक्‍का मागितला होता. कर्नाल येथील कंत्राटदाराकडून त्याचे पैसे स्वीकारताना पोपली यांना रंगेहाथ अटक झाली होती. पंजाब मुख्यमंत्र्यांच्या ‘अँटी करप्शन हेल्पलाईन’वर पोपली यांनी तक्रार केली होती.

12 किलो सोने जप्‍त

पोपली यांच्या घरातून 12 किलो सोने जप्‍त करण्यात आहे. सोन्याच्या प्रत्येकी एक किलोच्या 9 विटा, तीन किलो वजनाची सोन्याची49 बिस्किटे, 356 ग्रॅमची 12 सोन्याची नाणी, शिवाय चांदीच्या एक-एक किलोच्या 3 विटाही मिळाल्या आहेत.

Back to top button