सुहाना खान हिचे झोया अख्तरच्या चित्रपटातून बॉलीवूड पदार्पण? | पुढारी

सुहाना खान हिचे झोया अख्तरच्या चित्रपटातून बॉलीवूड पदार्पण?

मुंबई; पुढारी ऑनलाईन : सुहाना खान ही झोया अख्तरच्या चित्रपटातून बॉलीवूड पदार्पण करणार असल्याची चर्चा होत आहे. सुहाना खान हिला अभिनेत्री व्हायचे आहे. असे किंग खान शाहरूख नेहमीच सांगत आला आहे. आता दिग्दर्शक झोया अख्तर तिच्या आगामी चित्रपटातून २१ वर्षीय सुहानाला लाँच करण्याची तयारी करत असल्याचे समजते.

झोया सध्या इंटरनॅशनल कॉमिक बुक ‘आर्ची’च्या भारतीय रूपांतरावर काम करत आहे. नेटफ्लिक्ससाठी झोया हा प्रोजेक्ट बनवणार आहे. ही एक टीनएज स्टोरी आहे. ज्यात अनेक यंगस्टर्स दिसणार आहेत.

त्या यंगस्टर्सचा शोधही झोयाने सुरू केला आहे. मुख्य भूमिकेसाठी झोया शाहरूखची कन्या सुहाना खान हिचा विचार करत आहे. सध्या बोलणी अगदी प्राथमिक टप्प्यात असल्याचे समजते.

जर सुहाना आणि शाहरूखला पटकथा आवडली, तर चर्चा पुढे जाऊ शकते आणि हा चित्रपट सुहानाचा पदार्पणाचा चित्रपटही ठरू शकतो.

सुहानाने यापूर्वी 2018 मध्ये आलेल्या ‘द ग्रे पार्ट ऑफ ब्ल्यू’ या इंग्रजी शॉर्टफिल्ममध्ये काम केले आहे. 10 मिनिटांच्या या शॉर्टफिल्ममधील सुहानाच्या परफॉर्मन्सचे कौतुक झाले होते.

तेव्हापासून सुहानाच्या बॉलीवूड पदार्पणाच्या चर्चा सुरू झाल्या होत्या; पण शाहरूखने तिला शिक्षण पूर्ण करण्यास सांगितले होते.

सध्या सुहाना लंडनमध्ये फिल्ममेकिंग कोर्स करत आहे. त्यानंतर ती अ‍ॅक्टिंगमध्ये पाऊल ठेवणार आहे. तिने ‘झीरो’ चित्रपटासाठी शाहरूखला सहायक म्हणूनही काम केले होते.

Back to top button