हैदराबाद : अल्पवयीन मुलीवर कारमध्ये गॅंगरेप, संशयितांमध्ये आमदाराच्या मुलाचा समावेश | पुढारी

हैदराबाद : अल्पवयीन मुलीवर कारमध्ये गॅंगरेप, संशयितांमध्ये आमदाराच्या मुलाचा समावेश

पुढारी ऑनलाईन डेस्क : हैदराबाद येथे शनिवारी एका पब पार्टीला गेलेल्या अल्पवयीन मुलीवर कॉलेजच्या अल्पवयीन तरूणांनी एका कारमध्ये सामूहिक बलात्कार केला. १७ वर्षीय अल्पवयीन मुलगी आपल्या मैत्रीणीसोबत पब पार्टीत आली असता, ही घटना घडली. याप्रकणातील आरोपी तरूण हे अल्पवयीन आहेत. एका आमदाराचा मुलगाही यामध्ये सहभागी असल्याचे मानले जात आहे. या सामुहिक बलात्कारात त्याचा सहभाग असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

१७ वर्षीय पीडिता तिच्या मित्रासोबत पबमध्ये पार्टीसाठी गेली असता हा प्रकार घडला. पीडित मुलीची त्या पार्टीतील एका मुलाशी मैत्री झाली. त्यानंतर तो मुलगा आणि त्याच्या मित्रांसोबत तिने पब पार्टी सोडली. ज्याच्याशी तिची मैत्री झाली होती, त्याने मुलीला घरी सोडण्याचे आश्वासन दिले आणि मर्सिडीज कारमधून बसवून नेले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा अतिप्रसंग करण्यापूर्वी कारमधील सर्वजण एका पेस्ट्री शॉपमध्ये गेले होते. यानंतर जुबली हिल्स या परिसरात या मुलांनी कार थांबवली आणि आळीपाळीने या अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला. दरम्यान यामधील आमदाराच्या मुलाने भीतीपोटी याठीकाणाहून पळ काढल्याचे समजते.

जेव्हा मुलीच्या कुटुंबीयांनी तिच्या मानेवर झालेल्या जखमा पाहिल्या आणि तिला विचारले, तेव्हा तिने सांगितले की, पबमध्ये एका पार्टीत गेल्यानंतर काही मुलांनी तिच्यावर हल्ला केल्याची खोटी माहिती तिने दिले. मुलीच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर तिने सविस्तर जबानी दरम्यान बलात्कार केल्याचे स्पष्ट केले आहे.त्यानंतर पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे.

मुलीच्या वडिलांनी दिलेल्या माहितीच्या आधारे आम्ही पॉक्सो कायद्यांतर्गत  गुन्हा दाखल केला असल्याचे पोलिसांकडून समजत आहे. पण मुलीसोबत नेमकं काय घडलं आहे याची माहिती त्यांनी दिली नव्हती. यानंतर पीडित मुलगी काहाही सांगण्याच्या स्थितीत नव्हती त्यामुळे महिला अधिकाऱ्याला पाठवलं असता तिने घडलेला घटनाक्रम सांगितला. मुलगी आरोपींची ओळख पटवू शकत नाही. तिच्याकडे फक्त एक नाव आहे. आम्ही फु़टेज आणि तांत्रिक पुराव्यांच्या आधारे संशयितांचा शोध घेत आहोत, अशी माहिती पोलीस अधिकारी जोएल डेविस यांनी दिली.

हेही वाचा :

 

Back to top button