कोल्हापूर, आशिष शिंदे : जिल्ह्यात सध्या दमदार पाऊस सुरू आहे. सर्वदूर जोरदार पाऊस कोसळत असल्याने हवामान विभागाकडून 26 जुलैपर्यंत कोल्हापूरला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. पावसाळा सुरू झाल्यानंतर हवामान विभागाकडून रेड, ऑरेंज, यलो असे अलर्टस् देण्यात येतात. मात्र अलर्टस्चा नेमका अर्थ काय? हा प्रश्न सर्वांनाच पडला असेल. भारतीय हवामान शास्त्र विभागाच्या अहवालानुसार रेड अलर्टमध्ये अति मुसळधार पाऊस होण्याची शक्यता असते. रेड अलर्टमध्ये साधारणतः दिवसामध्ये 204.5 मि.मी. इतका पाऊस होण्याचा अंदाज असतो.
जुलै महिन्यातील सर्वाधिक पाऊस
24 तासांतील सर्वाधिक पाऊस — 174.2 मि.मी. (26/07/2005)
महिन्यातील सर्वाधिक पाऊस— 844.3 मि.मी. (1961)
महिन्यातील सर्वात कमी पाऊस— 78.2 मि.मी (2004)
2005 ला 24 तासांमध्ये बरसला होता 174.2 मि.मी.
यंदा 1 जून ते 23 जुलै याकालावधीत 498.6 मि.मी. पाऊस झाला आहे. या कालावधीत सरासरी 746.6 मि.मी. पाऊस होतो. तर भारतीय हवामान शास्त्र विभागाच्या एका अहवालानुसार कोल्हापूरमध्ये 1961 साली जुलै महिन्यात सर्वाधिक 844.3 मि.मी. इतका पाऊस झाल्याची नोंद आहे. तर 26 जुलै 2005 साली 24 तासांमध्ये तब्बल 174.2 मि.मी. इतका पाऊस झाला होता.