Corona in India : देशात २ हजार ६० कोरोनाग्रस्तांची भर, कोरोनाबाधितांच्या संख्येत घट

Corona in India : देशात २ हजार ६० कोरोनाग्रस्तांची भर, कोरोनाबाधितांच्या संख्येत घट

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : देशातील दैनंदिन कोरोनाबाधितांच्या संख्येत सौम्य घट नोंदवण्यात आली आहे. रविवारी दिवसभरात २ हजार ६० कोरोनाबाधितांची भर पडली. तर, १० रुग्णांचा कोरोनाने बळी घेतला. दरम्यान १ हजार ८११ रुग्णांनी कोरोनावर मात मिळवली. सोमवारी देशाचा कोरोना मुक्तीदर ९८.७५ टक्के नोंदवण्यात आला. तर, दैनंदिन कोरोनासंसर्गदर १.८६ टक्के तर आठवड्याचा कोरोनासंसर्गदर १.०२ टक्के नोंदवण्यात आला.

देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या आता ४ कोटी ४६ लाख ३० हजार ८८८ पर्यंत पोहचली आहे. यातील ४ कोटी ४० लाख ७५ हजार १४९ रुग्णांनी कोरोनावर मात मिळवली आहे. तर, २६ हजार ८३४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. दुदैवाने आतापर्यंत ५ लाख २८ हजार ९०५ रुग्णांचा कोरोनाने बळी घेतला आहे.

देशात कोरोनाविरोधात सुरू करण्यात आलेल्या लसीकरण अभियानातून आतापर्यंत २१९.३३ कोटी डोस लावण्यात आले आहेत. ९४.९६ कोटी नागरिकांचे संपूर्ण लसीकरण करण्यात आले आहे. तर, खबरदारी म्हणून २१.८६ कोटी बूस्टर डोस लावण्यात आले आहेत.रविवारी दिवसभरात १ लाख २५ हजार १३ डोस लावण्यात आले आहेत. देशात आतापर्यंत ८९.८६ कोटी तपासण्या करण्यात आल्या आहेत. यातील १ लाख १० हजार ८६३ तपासण्या रविवारी दिवसभरात करण्यात आल्याची माहिती आयसीएमआरकडून देण्यात आली आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news