CM Eknath Shinde: मुख्यमंत्री शिंदेंचे शक्तिप्रदर्शन: दसरा मेळाव्यासाठी २ लाखांच्या गर्दीचे टार्गेट

CM Eknath Shinde: मुख्यमंत्री शिंदेंचे शक्तिप्रदर्शन: दसरा मेळाव्यासाठी २ लाखांच्या गर्दीचे टार्गेट
Published on
Updated on

मुंबई : पुढारी वृत्तसेवा : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदे गटाने दसरा मेळाव्याच्या निमित्ताने संघटनात्मक ताकद दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. आझाद मैदानावर मंगळवारी (दि.२४) होणाऱ्या मेळाव्याला किमान २ लाख शिवसैनिकांच्या गर्दीचे टार्गेट दिले आहे. (CM Eknath Shinde)

शिवसेनेतील फु्टीमुळे मागील वर्षी शिवसेनेच्या दोन्ही गटांनी स्वतंत्र दसरा मेळाव्यांचे आयोजन केले होते. शिंदे गटाचा दसरा मेळावा बांद्रा कुर्ला संकुल येथे आयोजित करण्यात आला होता. ठाकरे गटाने या वर्षीही शिवाजी पार्कमध्येच दसरा मेळावा घेण्याचे निश्चित केले आहे. त्यामुळे वाद टाळण्यासाठी शिंदे गटाने आझाद मैदानची निवड केली आहे. (CM Eknath Shinde)

शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के म्हणाले की, प्रत्येक जिल्हाप्रमुखास ५ हजार शिवसैनिकांना आणण्याचे टार्गेट दिले आहे. महाराष्ट्रात ३६ जिल्हे आहे. त्यानुसार एकूण १ लाख ८० हजार कार्यकर्त्यांचे टार्गेट ठेवण्यात आले आहे. या मेळाव्यासाठी ५ हजार २०० बसेस तर ८ ते १० हजार चारचाकी वाहने येतील. तर विदर्भातून २ विशेष रेल्वे सोडण्यात आल्या आहेत. मुंबई बाहेरून येणाऱ्या लोकांकरिता वाशी, मुलुंड, पडघा आणि दहिसर चेकनाका येथे चहापान व अल्पोपहाराची व्यवस्था केली आहे. तसेच आझाद मैदानाच्या बाजूच्या मैदानातही तशी व्यवस्था केलेली आहे.

CM Eknath Shinde : कोकणातील शिवसैनिक बॅलार्ड इस्टेट येथे उतरतील

कोकणातून येणाऱ्या बसमधून येणारे शिवसैनिक बॅलार्ड इस्टेट येथे उतरतील आणि कनार्क बंदर, जीआरपी आयुक्त कार्यालय रोड येथे त्यांची पार्किंग व्यवस्था करण्यात आली आहे. मुंबई-ठाण्यातून येणाऱ्या बसमधील शिवसैनिक हे बॅलार्ड इस्टेट येथे उतरतील. त्यानंतर या वाहनांना कॉटन ग्रीन येथे पार्किंग दिले आहे. पश्चिम महाराष्ट्रातून येणाऱ्या बसेसमधील शिवसैनिक हर्निमन सर्कल येथे उतरतील, तर भाऊचा धक्का येथे त्या बसेसना पार्किंग दिलेले आहे. मराठवाडा व विदर्भातून येणाऱ्या बसेसमधून येणारे शिवसैनिक गेट ११ येथे उतरतील आणि शिवडी बीपीटी पार्किंग येथे त्या बसेसना पार्किंग दिलेले आहे.

विधानभवन, एनसीपीए व मनोरा आमदार निवास या ठिकाणी पार्किंग 

मुंबई-ठाणे व कोकणातून येणाऱ्या चार चाकी वाहनांकरिता विधानभवन, एनसीपीए व मनोरा आमदार निवास या ठिकाणी पार्किंग तर कुलाबा येथील बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याजवळ त्यांना पिकअप आणि ड्रॉपची सोय करण्यात आली आहे. पश्चिम महाराष्ट्रातून येणाऱ्या लहान वाहनांकरिता हर्निमन सर्कल, फोर्ट लेन व बॅलार्ड इस्टेट येथे पार्किंग आहे. तर हर्निमन सर्कल येथे पिकअप आणि ड्रॉपची व्यवस्था करण्यात आली आहे. मराठवाडा आणि विदर्भातून येणाऱ्या अशा वाहनांकरिता दाणाबंदर, रोरो भाऊचा धक्का, शिवडी ए ब्लॉक बीपीटी रोड येथे पार्किंग असून, पिकअप आणि ड्रॉप गेट क्र. १८ येथे आहे. पार्किंग आणि पिकअप आणि ड्रॉपची व्यवस्था अशा प्रकारे केली गेली आहे.

आझाद मैदानामध्ये ५० डॉक्टर, कार्डियाक अँब्युलन्स सोय 

आझाद मैदानामध्ये ५० डॉक्टर, कार्डियाक अँब्युलन्स, नियमित अँब्युलन्सची तसेच फायरब्रिगेडची व्यवस्था करण्यात आलेली आहे. सर्वसामान्य शिवसैनिकांना मुंबई महापालिका कार्यालयासमोरील गेट क्र.१,२ व ३ तसेच मेट्रो सिनेमा समोरील गेट क्र. ४ येथून प्रवेश दिला जाईल. तर अतिमहत्वाच्या व्यक्तींना गेट क्र. ५ मधून प्रवेश दिला जाईल. तसेच पत्रकारांना म मुंबई जिमखाना येथील गेट क्र. ६ येथून प्रवेश आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्व शिवसैनिकांना शांततामय मार्गाने व शिस्तपालन करून मेळाव्यामध्ये सहभागी होण्याचे, तसेच आपल्यामुळे कुणाला काही त्रास होणार नाही, याची काळजी घेण्याचे आवाहन केले आहे, अशी माहितीही म्हस्के यांनी दिली आहे.

हेही वाचा 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news