छत्तीसगडमधील बिजापूरमध्ये ‘आयईडी’ स्फोट, ‘सीआरपीएफ’चे दोन जवान जखमी

संग्रहित छायाचित्र.
संग्रहित छायाचित्र.

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : छत्तीसगडमधील विजापूर येथे आज (दि. ५) नक्षलींनी पेरलेल्‍या आयईडीचा स्‍फोट (IED blast) झाला. या हल्‍ल्‍यात केंद्रीय राखीव पोलीस दलाचे ( सीआरपीएफ) जवान जखमी झाले आहेत. जखमी जवानांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्‍यात आले असून, पुढील उपचारासाठी त्यांना रायपूरला पाठवण्यात येणार आहे.

"बिजापूर जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी पेरलेल्या 'आयईडी' स्फोटात 'सीआरपीएफ' ८५ बटालियनचे दोन जवान जखमी झाले आहेत. गंगलूर पोलिस स्टेशन हद्दीत हा हल्‍ला झाला. प्राथमिक उपचारानंतर जवानांना रायपूरला विमानाने हलवण्यात येत आहे, अशी माहिती छत्तीसगड पाेलिसांनी दिली.

एप्रिलमध्ये, छत्तीसगडच्या दंतेवाडा जिल्ह्यात माओवाद्यांनी केलेल्या आयईडी स्फोटात दहा जवान आणि एक चालक ठार झाला होता.

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news