संजय राऊत, “राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याबाबत भाजपानं असं का केलं?” | पुढारी

संजय राऊत, "राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याबाबत भाजपानं असं का केलं?"

पुढारी ऑनलाईन डेस्क : “आमची अयोध्या दौऱ्याची तयारी सुरू आहे. आदित्य ठाकरे यांचा १५ जून रोजी अयोध्या दौरा होणार आहे. ते इस्काॅन मंदिरालाही भेट देणार आहेत. अयोध्या आणि शिवसेनेचं नात जुनं आहे. राज ठाकरे यांच्या दौऱ्याबाबत भाजपानं असं का केलं? राजकीय स्वार्थ्यासाठी महाराष्ट्रातील नेत्यांचा भाजपाकडून वापर केला जात आहे. आपला वापर केला जातोय, हे नेत्यांना कळायला हवं. जर राज ठाकरेंनी मदत मागितली असती, तर आम्ही मदत केली असती”, अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी राज ठाकरेंचा अयोध्या दौरा रद्द झाल्यानंतर दिली आहे.

मनसे प्रमुख राज ठाकरेंचा अयोध्या दौरा स्थगित

काही दिवसांपासून चर्चेत असलेला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा अयोध्या दौरा नुकताच स्थगित करण्यात आला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी याबाबत ट्वीट करून माहिती दिली आहे. मात्र, पुण्यातील सभा होणार असून मनसैनिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन राज यांनी ट्वीटमध्ये केले आहे. प्रकृतीच्या कारणामुळे ५ जूनला होणारा अयोध्या दौरा पुढे ढकलला जाऊ शकतो, अशी चर्चा सुरू होती.

मनसैनिकांकडून अयोध्या दौऱ्याची जय्यत तयारीही सुरु झाली होती. अशातच उत्तर प्रदेशमधून मात्र राज यांच्या अयोध्या दौऱ्याला कडाडून विरोध करण्यात आला होता. तरीदेखील राज ठाकरे आपल्या अयोध्या दौऱ्यावर ठाम होते. परंतु, आता मात्र, राज ठाकरेंनी अयोध्या दौरा स्थगित केला असल्याची माहिती देण्यात आली आहे. राज ठाकरे यांनी ट्वीट करून अयोध्या दौरा स्थगित केल्याची घोषणा केली. मात्र, त्याचवेळी या मुद्यावर सविस्तरपणे बोलण्यासाठी पुण्यातील सभेत येण्याचे आवाहन राज यांनी मनसे कार्यकर्त्यांना केले आहे.

पहा व्हिडीओ : राज ठाकरेंची औरंगाबादमधील सभा थोडक्यात

हे वाचलंत का? 

Back to top button