चीनमधील ग्वांगडोंग प्रांतात महामार्ग कोसळला, १९ ठार

दक्षिण चीनमधील ग्वांगडोंग प्रांतातील मीझोउ शहरात महामार्गाचा एक भाग कोसळला.
दक्षिण चीनमधील ग्वांगडोंग प्रांतातील मीझोउ शहरात महामार्गाचा एक भाग कोसळला.

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : दक्षिण चीनमधील ग्वांगडोंग प्रांतातील मीझोउ शहरात आज ( दि. १ मे) पहाटे महामार्गाचा एक भाग कोसळला. या नैसर्गिक आपत्तीमध्‍ये १९ जण ठार झाल्‍याचे वृत्त 'एपी'ने दिले आहे. काही दिवसांपूर्वी या भागात मुसळधार पाऊस पडला होता.

ग्वांगडोंग प्रांतातील मीझोउ शहरातील अधिकाऱ्यांनी दिलेल्या निवेदनानुसार, पहाटे दोनच्‍या सुमारास महामार्गाचा 17.9 मीटर लांबीचा भाग कोसळला. या वेळी १८ कार उतारावरून कोसळल्‍या पडल्या. ही घटना पहाटे दोनच्या सुमारास घडली. तत्‍काळ बचाव पथकाने घटनास्‍थळी धाव घेतली. या नैसर्गिक आपत्तीमध्‍ये १९ जण ठार झाले आहेत तर ३० हून अधिक जण जखमी आहेत.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news