चिंतन शिबीर : वंशवादापासून काॅंग्रेस अमुक्तच; गांधी-वढेरा परिवार 'त्या' नियमाला अपवाद - पुढारी

चिंतन शिबीर : वंशवादापासून काॅंग्रेस अमुक्तच; गांधी-वढेरा परिवार 'त्या' नियमाला अपवाद

पुढारी ऑनलाईन डेस्क : उदयपूरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या काॅंग्रेस पक्षाच्या ३ दिवसीय चिंतन शिबिरात एआयसीसीने संघटनात्मक पुनर्रचना करण्याकरीता नियमांमध्ये बदल करण्याचा दावा करण्यात आला. या शिबिरात पक्षाच्या तिकिटासंदर्भात वंशवाद सीमित करण्याचीही चर्चा करण्यात आली. सर्व स्तरांवर युवकांना पदोन्नती आणि पदाधिकाऱ्यांसाठी ‘कूलिंग ऑफ पीरियड्स’चाही दावा पक्षाने केला आहे. ५ वर्षांच्या कार्यकालावरही भर देण्यात आला आहे.

‘एक कुटुंब-एक तिकीट’, या घोषणेमुळे शिबिरात उत्साहदेखील आला. पण, त्याला ‘अपवाद क्लाॅज’ जोडण्यात आला आहे. जेणेकरून गांधी-वधेरा परिवाराचे सत्तास्थान अबाधित राहील. एआयसीसीचे महासचिव अजय माकन म्हणाले की, “एक कुटुंब-एक परिवाराचा प्रस्तावाला सर्वमान्यता आहे. जर एखाद्या सदस्याला निवडणूक लढवायची असेल, तर त्याने किमान ५ पक्ष संघटनेमध्ये काम केलेले असेल पाहिजे, हा यामागे उद्देश आहे. त्यामुळे कोणताही नेता पक्षासाठी काम न केलेल्या व्यक्तीला तिकीट देऊ शकणार नाही.”

काॅंग्रेसमध्ये वंशवादासाठी दरवाजे खुले

अजय माकन यांनी सांगितलेल्या अर्थाचा विचार केला. तर नेत्यांची मुलांना पक्षामध्ये काम करावं लागेल, तेव्हाच त्यांना तिकीट मिळेल. माकन म्हणाले, “सोनिया गांधी आणि राहूल गांधींना हा नियम लागू असण्याची आवश्यकता नाही. कारण, भूत आणि वर्तमानकाळात पक्षाचे प्रमुख आहे. प्रियांका वधेरा यांच्याजवळ २०१७ पासून ५ वर्षांचा संघटन रेकाॅर्ड आहे. त्यामुळे त्यांना महासचिव पद देऊन राजकारणात प्रवेश मिळाला होता. काॅंग्रेसचे नेतृत्व हा या शिबिराचा मुद्दा नाही. कारण या मुद्दा संघटनात्मक निवडणुकांशी जोडलेला आहे”, असेही स्पष्टीकरण अजय माकन यांनी दिले.

काॅंग्रेस युवकांची होणार का? 

शिबिराच्या उद्घाटनादिवशी नेत्यांना ‘युवा अजेंडा’ यावर जास्त प्रकाश टाकण्यात आला. सांगण्यात आले की, सीडब्ल्युसीपर्यंत प्रत्येक संघटनेत ५० वर्षांच्या आतील नेत्यांना ५० टक्के प्रतिनिधीत्व असेल. काही नेत्यांना या मुद्द्यावर व्यवहारिक दृष्टीकोनाने विचार करायला हवा, असा दबाव टाकण्यात आला आहे. ५० टक्के कोट्यामध्ये ३३ टक्के महिला आणि २० टक्के एससी, एसटी, ओबीसी, अल्पसंख्य (जे वर्तमानात पुढील जाऊ शकतील) स्थान असणार आहेत.

पहिल्यांदा आपलं घर ठीक ठेवू : खरगे

काही नेत्यांनी आक्षेप नोंदविताना म्हंटलं आहे की, डोळे बंद करून काॅंग्रेस मित्रपक्षांची निवड करू शकत नाही. कारण, त्यांना आपल्या निवडणुकांतील स्थान बळकट करायचे असते आणि भापजाविरोधी प्रतिस्पर्ध्यांपासूनही काॅंग्रेसला दूर राहावं लागेल. कारण, त्यांना काॅंग्रेसचे पारंपरिक मतदान आपल्याकडे ओढण्याचा प्रयत्न करायचे असते. याचा अर्थ टीएमसी, आप, टीआरएस, बीजेडी यांच्यासोबत जाण्याचा प्रस्ताव काॅंग्रेसच्या नेत्यांचा विरोध आहे. परंतु, मल्लिकार्जुन खरगे म्हणाले की, “पहिल्यांदा आपलं घर ठीक करायचं आहे. आम्हाला काॅंग्रेसच्या लोकांना अधिक बळकट आणि शक्तीशाली करायचे आहे. नंतर आम्ही दुसऱ्यांकडे जाणार आहोत.”

पहा व्हिडीओ : आवाज फाऊंडेशनच्या सुमेरा अब्दुलअली लाऊड स्पीकरबाबतीत काय सांगतायत?

Back to top button