छत्तीसगड : रायपूर विमानतळावर हेलिकाॅप्टरचा अपघात; २ पायलटांचा जागीच मृत्यू | पुढारी

छत्तीसगड : रायपूर विमानतळावर हेलिकाॅप्टरचा अपघात; २ पायलटांचा जागीच मृत्यू

रायपूर, पुढारी ऑनलाईन : छत्तीसगडमधील रायपूर विमानतळावर एक हेलिकाॅप्टर दुर्घटनाग्रस्त झाले आहे. हेलिकाॅप्टरमध्ये पायलट ए.पी. श्रीवास्तव आणि कॅप्टन गोपाल कृष्ण पांडा होते. प्रॅक्टिस दरम्यान हेलिकाॅप्टर पुन्हा लॅंड केले जात होते, तेव्हा त्यामध्ये आग लागली आणि हेलिकाॅप्टर कोसळले. यात दोन पायलटांचा मृत्यू झाला.

रायपूरचे जिल्ह्याचे एसपी प्रशांत अग्रवाल म्हणाले की, “शहरातील माना क्षेत्रात स्वामी विवेकानंद विमानतळावर राज्य शासनाच्या हेलिकाॅप्टरचा अपघात झाला. हेलिकाॅप्टरमध्ये दोन पायलट होते. ते विमानतळावर ९.१० वाजता फ्लाईंग प्रॅक्टिस करत होते. तेव्हा हा अपघात झाला. त्यांना रुग्णालयात नेण्यात आले; परंतु डाॅक्टरांना त्यांनी मृत घोषीत केले.

राज्य सरकारचे हे हेलिकाॅप्टर होते. समोर आलेल्या माहितीनुसार राज्य सरकारचे हेलिकाॅप्टर रात्री ९.१० वाजता रायपूर विमानतळावर दुर्घटनाग्रस्त झाले. यामध्ये कॅप्टन ए. पी. श्रीवास्तव आणि कॅप्टन गोपाल कृष्ण पांडा या दोघांचा जागीच मृत्यू झाला. रुग्णालय प्रशासनानेदेखील त्यांच्या मृत्यूची माहिती दिलेली आहे.

या अपघातात हेलिकाॅप्टर चक्काचूर झाले आहे. त्याचे एक पंख दूरवर जाऊन पडले आहे. परंतु, हा अपघात कसा झाला, त्याचे कोणतेही कारण समोर आलेले नाही. छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी या अपघाताची माहिती ट्विटरवर देऊन मृत पायलटांना श्रद्धांजली वाहिलेली आहे. अपघातामध्ये हेलिकाॅप्टर चक्काचूर झाल्यामुळे जखमी पायलटांना बाहेर काढण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागले.

पहा व्हिडीओ : संभाजीराजेंनी केली नव्या संघटनेची घोषणा | युवराज संभाजीराजे छत्रपती |

Back to top button