न्यूयॉर्क; वृत्तसंस्था : अमेरिकन अब्जाधीश आणि वेश्या व्यवसायात दोषी आढळलेला सेक्स पार्टी आयोजक जेफ्री एपस्टाईन याच्याशी शास्त्रज्ञ स्टिफन हॉकिंग, माजी अमेरिकन राष्ट्राध्यक्ष बिल क्लिटंन, पॉपस्टार मायकेल जॅक्सन, ब्रिटिश राजघराण्यातील प्रिन्स अँड्र्यू यांच्यासह अनेक व्हीव्हीआयपींचे घनिष्ट संबंध असल्याचे दर्शविणारी कागदपत्रे न्यूयॉर्क न्यायालयाने सार्वजनिक केली आहेत. खटल्याशी संबंधित 170 नावेही गुरुवारी पहिल्यांदाच जाहीर केली. त्यामुळे अमेरिकेसह जगभरात मोठी खळबळ उडाली आहे. (Jeffrey Epstein)
व्हीव्हीआयपींसह पीडित मुली, साक्षीदार, कर्मचारी आणि अनेक आरोपींच्या नावांचाही त्यात समावेश आहे. बिल क्लिटंन यांचे नाव खटल्याच्या कागदपत्रांतून तब्बल 50 वेळा आलेले आहे. पीडित मुलगी व्हर्जिनिया गिफ्रे हिने 2015 मध्ये, जेफ्री याने तिला तिला शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांच्यासोबत शारीरिक संबंध ठेवण्यास भाग पाडले होते. स्टीफन हॉकिंग हे अनेक व्याधींनी त्रस्त होते, हे येथे उल्लेखनीय!
सेक्स पार्टी आयोजनासाठी जेफ्री याचे एक खासगी बेटच होते. 2016 मध्ये पीडित जोहाना स्जोबर्ग हिची न्यायालयात साक्ष झाली तेव्हा तिने बिल क्लिटंन यांनी जेफ्रीच्या खासगी विमानातून अनेकदा प्रवास केल्याचे नमूद केले होते.
क्लिटंन यांना तरुण मुली आवडतात, असे जेफ्रीने मला (जोहाना हिला) सांगितल्याचेही या जबाबात नमूद होते. जेफ्रीसह आरोपी असलेल्या घिसलेन मॅक्सवेल या त्याच्या मैत्रिणीच्या जबाबात, 1997 च्या जवळपास ती माजी अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या मार-ए-लागो क्लबमध्ये नोकरीला होती. जेफ्रीने इथे तिच्यासोबत पहिल्यांदा जबरदस्ती केली. नंतर ती जेफ्रीची सहकारी बनली, असे नमूद आहे. प्रिन्स अँड्र्यू, मायकेल जॅक्सन यांचे नावही कागदपत्रांतून अशाच संदर्भात आहेत.