सोलापूर : शहरातील महत्त्वपूर्ण उड्डाणपूलांची सुधारणा करावी, आमदार विजयकुमार देशमुखांची गडकरींकडे मागणी | पुढारी

सोलापूर : शहरातील महत्त्वपूर्ण उड्डाणपूलांची सुधारणा करावी, आमदार विजयकुमार देशमुखांची गडकरींकडे मागणी

सोलापूर; पुढारी वृत्तसेवा : सोलापूरचे भाजप आमदार विजयकुमार देशमुख यांनी केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे सोलापूर शहराच्या दृष्टीने महत्त्वाच्या दोन मागण्या केल्या. मंत्री नितीन गडकरी यांच्या सोलापूर दौऱ्यातील कार्यक्रमप्रसंगी ते बोलत होते. यामध्ये विशेष करून शहरातील दोन उड्डाणपूलांचा मुद्दा त्यांनी मांडला. हे दोन्ही उड्डाणपूल केंद्राच्या निधीतून पूर्ण करावे अशी महत्वपूर्ण मागणी त्यांनी केली.

आमदार सुभाष देशमुख यांनी आपल्या भाषणात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे अनेक मागण्या केल्या. भाजपने २०१४ ला पदभार घेतला. केवळ 5 वर्षात 300 किमी रस्ते पूर्ण झाले हे स्वप्न वाटतं होते. सोलापूर, पुणे, सांगली, विजापूर, गाणगापूर हे महामार्ग पूर्ण केले. “नितीन गडकरी हे एका दगडात दोन पक्षी मारतात” असं म्हणत देशमुख यांनी त्यांच्या कामांची माहिती यावेळी दिली.

नाविन्यपर्ण काम करण्याचे कौशल्य त्यांच्यात आहे, सर्व तीर्थक्षेत्र एकत्र जोडण्याचं काम गडकरींनी केले आहे असं यावेळी ते म्हणाले. सोलापूरला आलेला व्यक्ती सर्व ठिकाणी गेला पाहिजे, धार्मिक तीर्थक्षेत्रांसाठी काही प्रमुख सुधारणा कराव्यात, अशी महत्वाची मागणी त्यांनी केली.

तिरहे, सिना नदीवर काम सुरु केलेले आहे. वडकबाळ हा ब्रीज कम बंधारा करण्यासाठी त्यांनी प्रयत्न करावा, अशी मागणी त्यांनी केली. तसेच गडकरी यांचं वारकरी प्रेम पाहता, कुरुल, सिकंदर टाकळी पंढरपूर हा मार्ग करावा, ड्राय पोर्ट प्रोजेक्ट आणि लॉजिस्टिक्स पार्क उभारावे अशी मागणी त्यांच्याकडून करण्यात आली. आसरा रेल्वे ब्रीजवर ऊस वाहतूक मोठ्या प्रमाणात होते, पण हा ब्रीज जुना झाल्या असल्याने धोक्याचा बनला आहे. त्यामुळे आसरा ब्रीजसाठी नवा आराखडा बनविण्यात यावा. अशा मागण्या आमदार देशमुखांनी नितीन गडकरी यांच्याकडे केली.

हेही वाचा

Back to top button