अबब! जैन मुलीची कठोर तपश्चर्या! 16 व्या वर्षी फक्त पाणी पिऊन पूर्ण केला 110 दिवसांचा उपवास

अबब! जैन मुलीची कठोर तपश्चर्या! 16 व्या वर्षी फक्त पाणी पिऊन पूर्ण केला 110 दिवसांचा उपवास

पुढारी ऑनलाईन डेस्क : girl completes 110 day fast : मुंबईतील कांदिवली (पश्चिम) येथील एका गुजराती कुटुंबातील 16 वर्षीय मुलीने तब्बल 110 दिवसांचा उपवास यशस्वीरित्या पूर्ण केला. ही मुलगी गेल्या तीन महिने 20 दिवसांपासून अन्न ग्रहण न करता केवळ पाणी पिऊन राहिली. या यशाचा आनंद साजरा करण्यासाठी कुटुंबाने एका भव्य सोहळ्याचे आयोजन केले होते. जैन धर्मातील तज्ज्ञांनी सांगितले की, काही साधू आणि साध्वींनी अशी तपश्चर्या केली असली तरी तरुण मुलीने एवढा दीर्घकाळ उपवास करणे ही मोठी गोष्ट आहे.

टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, 11 जुलै रोजी 16 दिवसांचा उपवास करण्याचा संकल्प घेऊन क्रिशा शहा हिचा उपवासाचा प्रवास सुरू झाला. त्या आधी क्रिशाने तिचे गुरु मुनी पद्मकलशा महाराज यांच्याकडे उपवास सुरू करण्याची परवानगी मागितली. त्यानंतर क्रिशाने सकाळी 9 ते संध्याकाळी 6.30 या वेळेतच फक्त कोमट पाणी प्राशन करून 16 दिवसांचा उपवास पूर्ण केला. आरोग्याची कोणतीही समस्या नसल्याने क्रिशाने उपवासाचा कालावधी आणखी 10 दिवसांनी वाढवण्याचा निर्णय घेतला.

क्रिशाचे वडील जिगर शहा हे स्टॉक ब्रोकर आहेत, तर तिची आई गृहिणी आहे. हे कुटुंब मूळचे मेहसाणा जिल्ह्यातील सालदी गावचे आहे. या कुटुंबातील दोन मुलींमध्ये क्रिशा ही मोठी आहे. शाह कुटुंबीयांनी सांगितले की, क्रिशाने यापूर्वी नऊ वर्षांची असताना आठ दिवसांचा उपवास केला होता तर 14 वर्षांची असताना तिने 16 दिवस उपवास केला होता.

क्रिशा प्रदीर्घ उपवास पूर्ण करेल हा विश्वास गुरूंना होता. 26 दिवसांचा उपवास पूर्ण झाल्यानंतर पुढील 31 दिवसांचे लक्ष्य ठेवण्यात आले. त्यानंतर पुन्हा 51 दिवस पुढे उपवास सुरू ठेवला. पर्युषण महिन्यातील 51 दिवसांचे व्रत यशस्वीपणे पूर्ण केल्यानंतर त्यांनी पुन्हा 20 दिवस उपवास करण्याचा संकल्प केला.

क्रिशाची आई रुपा यांनी सांगितले की, 40 दिवसांच्या उपावासादरम्यान, क्रिशा कॉलेजलाही जात होती. क्रिशा शहा ही कांदिवलीच्या केईएस कॉलेजमध्ये 11वीच्या वर्गात शिकते. क्रिशाच्या 71 दिवसांच्या उपवासानंतर, तिच्या मार्गदर्शकांना विश्वास होता की ती 108 दिवसांचे कठीण लक्ष्य साध्य करू शकते. पण कुटुंबियांना धाकहुक लागून राहिली होती. तीन महिन्यांनंतर पुढे क्रिशा उपवासाचा प्रवास कशी पूर्ण करेल याची खात्री कुटुंबियांना नव्हती, पण गुरूचा आपल्यावरील असणा-या विश्वासाच्या बळावर क्रिशाने 110 दिवसांच्या उपवासाचे शिवधणुष्य लिलया पेलले.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news