सोलापूर ; पुढारी वृत्तसेवा : केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्र्यालयाच्या वतीने जाहीर केलेल्या सर्वात मोठ्या सुरत-चेन्नई ग्रीनफिल्ड कॉरिडोर एक्स्प्रेस वेच्या भूसंपादनाची अधिसूचना नुकतीच (दि. 5 एप्रिल) जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील चार तालुक्यांतील जवळपास 61 गावांतून हा महामार्ग जाणार आहे. त्यासाठी 151 कि.मी.च्या रस्त्यासाठी भूसंपादन करण्यात येणार आहे. या रस्त्यामुळे सोलापूर जिल्ह्याचा कायापालट होऊन वाहतूक व विकासाला गती येणार आहे.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी रस्ते विकास अंतर्गत भारतमाला योजनेंतर्गत सुरत-चेन्नई ग्रीनफिल्ड कॉरिडोर एक्स्प्रेस वेची घोषणा केली होती. यामध्ये हैदराबाद-चेन्नई महामार्ग सुरत, नाशिक, अहमदनगर, सोलापूर या जिल्ह्यांतून जाणार आहे. सोलापूर जिल्ह्यातील बार्शी, दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर आणि अक्कलकेाट तालुक्यांतून जात आहे.त्यामुळे सेालापूर जिल्ह्याच्या विकासाला चालना मिळणार आहे.
उत्तर भारत दक्षिण भारत हे अंतर जवळपास पाच तासांनी कमी होण्याची शक्यता आहे. तसेच या राष्ट्रीय महामार्गामुळे जवळपास 400 किमीचा अंतर कमी होणार आहे.अनेक राज्यांना जोडणारा हा महत्वकांक्षी प्रकल्प आहे.
यामध्ये सोलापूर जिल्ह्यताील बार्शी तालुक्यातील बळेवाडी, कव्हे, दडशिंगे, पानगांव, लक्ष्याचीवाडी, नागेाबाचीवाडी, कासारवाडी, अलीपूर, उपळाई, उंडेगाव, काळेगांव, मानेगाव, सासुरे, वैराग, रातंजन, सर्जापूर, हिंगणी, चिंचखोपण या 18 गावांचा समावेश आहे. उत्तर सोलापूर तालुक्यातील तरटगांव, मार्डी, कारंबा, गुळवंची, बाणेगाव, खेड, केगांव, शिवाजी नगर या गावांचा समावेश आहे.
दक्षिण सोलापूर तालुक्यातील कासेगाव, उळे, बोरामणी, तांदुळवाडी, संगदरी, मुस्ती, दर्गनहळ्ळी, धोत्री, कुंभारी, तिर्थ, यत्नाळ, फताटेवाडी, होटगी, हत्तूर, घोडातांडा आणि मद्रे अशा 16 गावांचा समोवश आहे.अक्कलकोट तालुक्यातील चप्पळगाववाडी, दहिटणेवाडी, कोन्हाळी, हसापूर, नागणहळ्ळी, बोरेगाव, डोंबरजवळगे, बर्हाणपूर, चप्पळगांव, उमरगे, मैंदर्गी, नागोरे, मुगळी, अक्कलकोट, मिरजगी, संगोगी आणि दुधनी या 17 गावाचा समावेश आहे.
त्यासाठी शासनाच्यावतीने तातडीने पावले उचलण्यात येत आहेत.तसेच जिल्हा प्रशासनाला वारंवार याबाबत सूचना केल्या जात आहेत.जिल्ह्यातील 61 गावांतून जाणार्या या महामार्गाच्या भूसंपादनासाठी जिल्हा प्रशासनाने भूसंपादन अधिकारी म्हणून अरुणा गायकवाड यांची नेमणूक केली आहे. त्यामुळे लवकरच या रस्त्याचे नकाशे बनविण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली.