Amarnath cloudburst : ढगफुटीनंतर अमरनाथ यात्रा स्थगित, मृतांचा आकडा १६ वर, ४० अद्याप बेपत्ता

अमरनाथ ढगफुटी दुर्घटना
अमरनाथ ढगफुटी दुर्घटना

पुढारी ऑनलाईन : जम्मू काश्मीरमधील अमरनाथ गुहेजवळ ढगफुटीने हाहाकार उडाला. या दुर्घटनेत १६ जणांचा मृत्यू झाला असून सुमारे ४० जण जखमी झाले आहेत. अद्याप ४० जण बेपत्ता आहेत. घटनास्थळी भारतीय लष्कर, एनडीआरफ आणि एसडीआरफच्या तुकड्या बचावकार्य करत आहेत. या ठिकाणी वेगाने बचावकार्य सुरु आहे. या दुर्घटनेतील मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे. या दुर्घटनेमुळे अमरनाथ पायी यात्रा तात्पुरती स्थगित करण्यात आली असल्याची माहिती भारतीय सैन्यदलाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.

या दुर्घटनेतील मृतांचा आकडा १६ झाला असून अद्याप ४० जण बेपत्ता आहेत. सध्या दरड कोसळणे थांबले आहे. पण पाऊस सुरुच आहे. यामुळे बचावकार्यात अडथळे येत आहेत. ४ एनडीआरएफ पथकांतील १०० हून अधिक बचावकर्ते बचावकार्यात गुंतले आहेत. याशिवाय भारतीय लष्कर, SDRF, CRPF आणि इतरांनी बचावकार्य सुरूच ठेवले असल्याची माहिती एनडीआरएफचे डीजी अतूल करवाल यांनी दिली.

जम्मू-काश्मीरमधील अमरनाथ गुहेजवळ ढगफुटीची दुर्घटना झाली आहे. यामध्ये तीन लंगर आणि अनेक तंबू पाण्याच्या जोरदार प्रवाहाने वाहून गेले आहेत. यामध्ये दोन जण पाण्यात वाहून गेल्याचे समजते आहे. पण अनेक जणांना यात जीव गमवावा लागला आहे. गुहेजवळ मुसळधार पाऊस आणि भूस्खलनामुळे पाणी आल्याचे सांगण्यात येत आहे. सध्या स्थानिक प्रशासनही मदत आणि बचावकार्यात गुंतले असून, भाविकांना सुखरूप बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

अमरनाथ गुहेजवळ हवामान स्वच्छ आहे. जखमींना हेलिकॉप्टरच्या सहाय्याने तळावर आणण्यात आले आहे. अमरनाथ यात्रा थांबवण्यात आली आहे. आम्ही लोकांना पुढे न जाण्याचा सल्ला देत असल्याची माहिती आयटीबीपीचे पीआरओ विवेक कुमार पांडे यांनी दिली. BSF MI 17 हेलिकॉप्टर जखमी व्यक्तींना नेण्यासाठी तसेच नीलग्रह हेलिपॅड बालटाल ते BSF कॅम्प श्रीनगरपर्यंत पुढील उपचारासाठी किंवा मृतदेह नेण्यासाठी कार्यरत आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news