12 जुलै ठरला जागतिक क्रिकेटसाठी सर्वात भयानक दिवस! चक्क 9 फलंदाज ठरले ‘डक’

12 जुलै ठरला जागतिक क्रिकेटसाठी सर्वात भयानक दिवस! चक्क 9 फलंदाज ठरले ‘डक’
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : 12 जुलै 2022 रोजी खेळल्या गेलेल्या भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिल्या एकदिवसीय सामन्यात (eng vs ind 1st ODI) इंग्लंडचे 4 फलंदाज 0 धावांवर बाद झाले. इतकंच नाही तर इंग्लंडशिवाय आयर्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात डब्लिनमध्ये खेळल्या गेलेल्या दुसऱ्या वनडेमध्ये 5 फलंदाज खातेही न उघडता तंबूत परतले. वास्तविक, भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिल्या एकदिवसीय सामन्यात जेसन रॉय (0), जो रूट (0), बेन स्टोक्स (0) आणि लिव्हिंगस्टोन (0) आले तसे माघारी परतले. हा सामना भारताने 10 विकेट्स राखून जिंकला.

डब्लिनमध्ये खेळल्या गेलेल्या दुसऱ्या एकदिवसीय (Ireland vs New Zealand, 2nd ODI) सामन्याबद्दल बोलायचे झाल्यास या सामन्यात आयर्लंडचे 3 फलंदाज पॉल स्टॉलिंग, क्रेग यंग आणि जोशुआ लिटल शुन्यावर बाद होऊन पॅव्हेलियनमध्ये परतले. त्यानंतर धावांचा पाठलाग करताना मार्टिन गुप्टिल आणि विल यंग हे न्यूझीलंडचे फलंदाजंनी खातेही न उघडता तंबू गाठाला. मात्र, न्यूझीलंडने या सामन्यात 3 विकेट्सने विजय मिळवला. पण हे आकडे बघता, आपण निश्चितपणे म्हणू शकतो की 12 जुलै 2022 हा दिवस फलंदाजांसाठी एक काळा दिवस ठरला.

भारताने इंग्लंडचा उडवला धुव्वा

भारताविरुद्धच्या सामन्यात इंग्लंडने प्रथम फलंदाजी करत 25.2 षटकात केवळ 110 धावा केल्या आणि संपूर्ण संघ पॅव्हेलियनमध्ये परतला. यानंतर भारताने 18.4 षटकांत एकही विकेट न गमावता सहज लक्ष्य गाठले. जसप्रीत बुमराहला (7.2 षटकांत 19 धावां देवून 6 बळी घेतले) त्याच्या अद्वितीय कामगिरी बद्दल त्याला प्लेअर ऑफ द मॅचचा किताब देण्यात आला.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news