12th Fail : रिलीज झाला ’12वीं फेल’चा ट्रेलर, UPSC एस्पायरेंट्सची दमदार कहाणी

12 fail
12 fail
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : विधु विनोद चोप्रा बॉलीवूडमध्ये स्टुडेंट्स लाईफवर आधारित चित्रपट बनवण्यासाठी ओळखले जातात. याआधी त्यांचा 3 इडियट्स हा चित्रपट ब्लॉकबस्टर ठरला होता. (12th Fail ) आता ते पुन्हा परतले असून आगामी चित्रपट १२ वी फेल घेऊन येत आहेत. दिल्लीतील मुखर्जी नगरमध्ये राहणारा UPSC एस्पायरेंट्सची कहाणी या चित्रपटात आहे. आता १२ वी फेल चित्रपटाचा ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे. (12th Fail)

संबंधित बातम्या –

कथा सत्य घटनेवर आधारित

१२वी फेल ची कथा खऱ्या आयुष्यावर आधारित आहे. हा चित्रपट अनुराग पाठक यांनी लिहिलेल्या याच नावाच्या कादंबरीवर आधारित आहे, ज्यामध्ये आयपीएस अधिकारी मनोज कुमार शर्मा आणि आयआरएस अधिकारी श्रद्धा जोशी यांचा अद्भुत प्रवास सांगितला आहे. १२ वी नापास झालेल्या खऱ्या विद्यार्थ्यांमध्ये हे चित्रीकरण करण्यात आले आहे.

या चित्रपटाचे दिग्दर्शन ३ इडियट्सचे निर्माते विधू विनोद चोप्रा यांनी केले आहे. झी स्टुडिओची निर्मिती आहे. हा चित्रपट २७ ऑक्टोबर २०२३ रोजी जगभरातील चित्रपटगृहांमध्ये रिलीज होईल. या चित्रपटात विक्रांत मेसी मुख्य भूमिकेत आहे. तमिळ, तेलुगु आणि मल्याळमसह हिंदीमध्ये हा चित्रपट रिलीज होणार आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news