Maruti Suzuki New Age Baleno : मारुती सुझुकीची न्यू एज बलेनो लॉन्च, जाणून घ्या किंमत

Maruti Suzuki New Age Baleno : मारुती सुझुकीची न्यू एज बलेनो लॉन्च, जाणून घ्या किंमत
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्‍क  

मारुती सुझुकीने भारतात प्रीमियम हॅचबॅक, बलेनोची फेसलिफ्टेड नवीन कार (Maruti Suzuki New Age Baleno) लॉन्च केली आहे. 2015 मध्ये प्रथम मारूती सुझुकीने बलेनो लॉन्च केली होती. त्‍यानंतर जवळपास 7 वर्षांनी Maruti Suzuki ने New Age Baleno आणली आहे. यामध्ये नवीन वैशिष्ट्यांचा समावेश करण्यात आला आहे. नवीन 2022 मारुती सुझुकी बलेनो फेसलिफ्टला हनीकॉम्ब पॅटर्न आणि नवीन बंपरसह मोठी लोखंडी जाळी दिली आहे. आणि ही जाळी सर्व-एलईडी हेडलॅम्प आणि डीआरएलने जोडलेली आहे. तसेच त्‍यामध्ये सी-आकाराचे एलईडी टेललॅम्प दिले आहेत. शिवाय, ही सहा रंगांमध्ये उपलब्‍ध आहेत.

वैशिष्ट्ये

फेसलिफ्टेड बलेनोमध्ये अनेक नविन वैशिष्ट्ये आहेत. यामध्ये Android Auto, Apple CarPlay आणि 40+ कनेक्टेड कार वैशिष्ट्यांसह नवीन 9.0-इंच स्मार्टप्ले प्रो+ टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम आहे. तसेच हेड-अप डिस्प्ले, 360-डिग्री पार्किंग कॅमेरा, ऑल-एलईडी लाइटिंग सिस्टम, फ्लॅट-बॉटम स्टीयरिंग व्हील आणि 6 एअरबॅग्ज, ESP, हिल होल्ड असिस्ट सुरक्षा उपकरणांचा समावेश करण्यात आला आहे.

इंजिन

मारुती बलेनो 2022 मध्ये नवीन 1.2-लिटर K-सिरीज ड्युअल जेट, ड्युअल VVT पेट्रोल इंजिन आहे. जे जास्‍त मायलेज देईल. स्टार्ट आणि स्टॉप सिस्टमसह हे 88.5 HP पॉवर आणि 113 Nm पीकअप टॉर्क देईल. यामध्ये 5-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स आणि AMT (AGS) ला जोडण्यात आले आहे. मॅन्युअल प्रकाराची गाडी ही 22.35 kmpl ॲव्हरेज देईल तर ॲटो 22.94 kmpl ॲव्हरेज देईल असा कंपनीने दावा केला आहे.

Maruti Suzuki New Age Baleno : किंमत

मारुती सुझुकीने चार ट्रिम लेव्हलमध्ये नवीन बलेनो ग्राहकांसाठी बनवली आहे. यामध्ये सिग्मा, डेल्टा, झेटा आणि अल्फा आहे. याची किंमती 6.35 लाख रुपयांपासून सुरू होत आहे.

हे ही वाचा  

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news