पुणे : पुढारी वृत्तसेवा
केंद्रीय रस्ते वाहतूक आणि राष्ट्रीय महामार्ग परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी परिवहन क्षेत्रात विशेष सुधारणा करण्यासाठी विशेष कार्यक्रम हाती घेतले आहेत. महामार्गावरील अवजड वाहनांची गती वाढविण्यात येणार असून, इंधन बचतीवर भर दिल जाणार आहे. त्यासाठी देशात २२ हरित महामार्ग निर्माण करण्याचा निर्णय घेतला गेला आहे. आंध्रप्रदेशत 21,559 कोटींच्या रस्ते विकास कामांच्या उद्घाटन प्रसंगी ते एका सभेत बोलत होते. अवजड वाहतुकीसाठी लागणार खर्च भारतात मोठी समस्या झाली आहे.
देशात एकूण 2 हरित मार्ग बनवणार असून त्यापैकी 6 हे आंध्रप्रदेशात बनणार आहेत. बंदरगाह महामार्ग हा मोठा महत्वाकांक्षी जलमार्ग असणार आहे. असे गडकरी म्हणाले
भारताला आर्थिक दृष्ट्या प्रबळ बनविण्यासाठी आंध्रप्रदेशचा मोठा वाटा आहे. मोठ्या आणि महत्वाकांक्षी प्रकल्पासाठी मोठी राजकीय इच्छाशक्ति असणे गरजेचे आहे असे त्यांनी सांगितले. रायपुर आणि विशाखापट्टनम च्या दरम्यान 465 किलो मीटर चा महामार्ग छत्तीसगड, ओडिसा आणि आंध्रप्रदेशातून जाणार आहे. यासाठी 16,102 कोटींचा खर्च करण्यात येणार आहे.