पुढारी ऑनलाईन : अतिशय पुरातन वारसा असलेली संस्कृती म्हणून भारतीय संस्कृतीकडे पाहिलं जातं. भारतीय संस्कृतीमध्ये प्रत्येक मुहूर्ताला, कालावधीला त्यांचे एक खास महत्त्व आहे. याचप्रमाणे पितृपक्षाचेही त्याचे खास महत्त्व आहे. या पंधरवड्यात आपल्या पितरांचे स्मरण करून त्यांचे श्राद्धविधी करण्याची पद्धत आहे. या पद्धतीची भुरळ आता पाश्चात्यांनाही पडली. याचं उदाहरण म्हणजे अलीकडेच 12 जर्मन नागरिकांनी ज्यात 11 स्त्रियांचा समावेश होता. आपल्या पूर्वजांच्या आत्म्यास शांती मिळावी यासाठी पिंडदान केलं. विशेष म्हणजे या 12 नागरिकांनी भारतीय वेशभुषेत हे विधी पार पडले. यातील 11 स्त्रियांनी साडी परिधान केली होती. तर 1 पुरुषाने धोतर नेसले होते.
या सर्वांनी पिंडदान अनुष्ठान आणि जलतर्पण हे विधी पार पाडले. यामध्ये नतालिया, स्वेतलाना, ऑक्साना, शासा, इरिना, मार्गेरिटा, ग्रिचकेविच, एलिसेंट्रा आणि केविन यांचा समावेश आहे. गया येथील फागू नदीच्या किनारी हे विधी पार पडले.
हेही वाचा :