सरत्या महिन्यात देशाच्या निर्यातीत 12.7 टक्क्यांची घट

सरत्या महिन्यात देशाच्या निर्यातीत 12.7 टक्क्यांची घट
Published on
Updated on
नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा :  सरत्या महिन्यात देशाच्या निर्यातीत 12.7 टक्क्यांची घट झाली असल्याची माहिती व्यापार मंत्रालयाकडून (Ministry of Commerce) सोमवारी (दि.१५) देण्यात आली. गतवर्षीच्या एप्रिलमधील 39.7 अब्ज डॉलर्सच्या तुलनेत यंदाच्या एप्रिलमध्ये 34.66 अब्ज डॉलर्सची निर्यात झाली आहे.
वरील कालावधीत आयात देखील 14 टक्क्याने कमी होऊन 58.06 अब्ज डॉलर्सच्या तुलनेत 49.9 अब्ज डॉलर्स इतकी झाली आहे. पेट्रोलियम पदार्थ, क्रूड आणि इतर पदार्थ तसेच कोळशाची आयात कमी झाल्याने आयात बिल कमी झाल्याचे विदेश व्यापार खात्याचे महासंचालक संतोष सारंगी यांनी सांगितले. सरत्या एप्रिल महिन्यात व्यापार तूट 15.24 अब्ज डॉलर्स इतकी नोंदवली गेली आहे.
हेही वाचा 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news