गान कोकिळा लता मंगेशकर यांच्या अस्थींचे रामकुंडात विसर्जन | पुढारी

गान कोकिळा लता मंगेशकर यांच्या अस्थींचे रामकुंडात विसर्जन

नाशिक : पुढारी ऑनलाईन : मंगेशकर कुटुंबीय नाशिक मधील रामकुंडावर दाखल झाले आहे. लता मंगेशकर यांच्या अस्थी रामकुंड येथे विसर्जनासाठी आणण्यात आल्या आहेत. थोड्या वेळातच अस्थींचे विसर्जन येथे करण्यात येत आहे. अस्थींचे विधीवत पूजन सुरु आहे.

यासाठी उषा मंंगेशकर, हृदयनाथ मंगेशकर, आदिनाथ मंगेशकर, मिलिंद नार्वेकर आदी मान्यवर रामकुंडावर उपस्थित आहेत. लता मंगेशकर यांचे दि. ६ फेब्रुवारी रोजी निधन झाले. दादरच्या शिवाजी पार्कवर त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी मोठा जनसागर लोटला होता. ज्यांना अंत्ययात्रेत सहभागी होता आले नाही, त्यांना अस्थिकलशाचे दर्शन घेता येणार आहे. रामकुंड परिसरात लता मंगेशकर यांच्या अस्थी कलशाचे दर्शन घेण्यासाठी मोठी गर्दी झाली आहे.

दरम्यान मालेगाव स्टँड, ढिकले वाचनालाय, खांदवे सभागृह, दुतोंडया मारुती व यशवंत महाराज पटांगणाकडून रामकुंडाकडे जाणारे सर्व रस्ते चारचाकी वाहनांसाठी बंद ठेवण्यात आले आहेत. मंगेशकर कुटुंबिय आज नाशिकमध्ये उपस्थित असल्याने शासकीय विश्रामगृह आरक्षित करण्यात आले आहे. तसेच धार्मिक विधी पार पडणार आहेत.

दैनिक पुढारीचे नाशिक आणि उत्तर महाराष्ट्रासाठीचे हे फेसबुक पेज… नाशिकसह उत्तर महाराष्ट्रातील विविध बातम्या, लेख, व्हिडिओ असे सगळं काही या पेजवर असेल. नाशिकच्या द्राक्ष्यांचा गोडवा आणि मिसळचा झणझणीतपणा एकाच वेळी देण्याचा प्रयत्न आमची टीम करत आहे. त्यामुळे नक्की लाईक करा आणि फॉलो करा.. मंडळ आभारी आहे.. 😃 पेज लाईक करण्यासाठी येथे क्लिक करा.

हेही वाचा ;

Back to top button