पुढारी ऑनलाईन डेस्क : IPL 2024 Mini Auction : इंडियन प्रीमियर लीग 2024 साठी मिनी लिलाव 19 डिसेंबर 2023 रोजी दुबईत होणार आहे. दरम्यान, लिलावासाठी एकदिवसीय विश्वचषक 2023 मध्ये चमकदार कामगिरी करणा-या बड्या स्टार्सनी आपल्या नावांची नोंदणी केली आहे. यामध्ये मिचेल स्टार्क, पॅट कमिन्स, ट्रॅव्हिस हेड, डॅरिल मिशेल आणि रचिन रवींद्र यांसारख्या मोठ्या खेळाडूंचा समावेश आहे.
लिलावासाठी नोंदणी केलेल्या 1,166 खेळाडूंपैकी 830 भारतीय खेळाडू आहेत, तर 336 परदेशी खेळाडू आहेत. उल्लेखनीय म्हणजे, या यादीत 212 कॅप्ड खेळाडूंनी नोंदणी केली आहे, तर 909 खेळाडू अनकॅप्ड आहेत. याशिवाय 45 सहयोगी खेळाडूंनी लीगमध्ये नशीब आजमावण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई इंडियन्स (MI) द्वारे रिलीज केलेल्या इंग्लंडच्या वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चरने आपल्या नावाची नोंदणी केलेली नाही.
830 भारतीयांपैकी 18 कॅप्ड खेळाडू आहेत. या खेळाडूंमध्ये वरुण आरोन, केएस भरत, केदार जाधव, सिद्धार्थ कौल, धवल कुलकर्णी, शिवम मावी, शाहबाज नदीम, करुण नायर, मनीष पांडे, हर्षल पटेल, चेतन साकारिया, मनदीप सिंग, बरिंदर सरन यांचा समावेश आहे. याशिवाय शार्दुल ठाकूर, जयदेव उनाडकट, हनुमा विहारी, संदीप वारियर आणि उमेश यादव हे देखील लिलावात उतरतील. कॅप्ड भारतीय खेळाडूंपैकी हर्षल, जाधव, शार्दुल आणि उमेश यांना त्यांच्या फ्रँचायझींनी अलीकडेच रिलीज केले आहे. या चौघांची मूळ किंत 2 कोटी ठेवली आहे.
आदिल रशीद, हॅरी ब्रूक आणि डेविड मलान यांच्यासह अनेक इंग्लिश खेळाडूंनी लिलावासाठी आपल्या नावाची नोंदणी केली आहे. रेहान अहमद (50 लाख), गुस ऍटकिन्सन (1 कोटी), टॉम बॅंटन (2 कोटी), सॅम बिलिंग्स (1 कोटी), हॅरी ब्रूक (2 कोटी), ब्रायडन कार्स (50 लाख रुपये), टॉम कुरन (1.5 कोटी), बेन डकेट (2 कोटी), जॉर्ज गार्टन (50 लाख), रिचर्ड ग्लीसन (50 लाख), सॅम्युअल हेन (50 लाख), ख्रिस जॉर्डन (1.5 कोटी), डेविड मालन (1.5 कोटी), टायमल मिल्स (1.5 कोटी), जेमी ओव्हरटन (2 कोटी), ऑली पोप (50 लाख), आदिल रशीद (2 कोटी), फिलिप सॉल्ट (1.5 कोटी), जॉर्ज स्क्रिमशॉ (50 लाख), ऑली स्टोन (75 लाख), डेव्हिड विली (2 कोटी), ख्रिस वोक्स (2 कोटी), ल्यूक वुड (50 लाख) आणि मार्क एडेयर (50 लाख) यांचाही या यादीत समावेश आहे.