कोल्हापूर : घरेलू कामगारांना दहा हजार अनुदान

कोल्हापूर : घरेलू कामगारांना दहा हजार अनुदान

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : राज्यातील 55 वर्षांवरील आणि कामगार कल्याण मंडळाकडे सक्रिय नोंदणी (दरवर्षी नूतनीकरण केलेली) असलेल्या घरेलू कामगारांना दहा हजार रुपयांचे अनुदान देण्यात येणार आहे. या कामगारांना 'सन्मानधन' योजनेंतर्गत हा लाभ दिला जाणार आहे. या योजनेचा लाभ मात्र मर्यादित कामगारांनाच होणार आहे.

महिला घरेलू कामगारांचा सामाजिक व आर्थिक स्तर उंचावण्यासाठी दरवर्षी या योजनेंतर्गत अनुदान देण्यात येणार आहे. दरवर्षी 31 डिसेंबर रोजी वयाची 55 वर्षे पूर्ण केलेल्या आणि ज्यांची नोंदणी सक्रिय असेल, अशाच कामगारांना याचा लाभ होणार आहे. हे अनुदान पात्र कामगारांच्या थेट बँक खात्यावर जमा होणार आहे. राज्यात 5 लाख 47 हजारांवर घरेलू कामगारांची नोंद आहे. मात्र, यापैकी केवळ 15 हजार 249 कामगारांचीच जीवित नोंदणी आहे. यामध्येही या अनुदानासाठी पात्र ठरणार्‍या 55 वर्षांपेक्षा अधिक वयाच्या कामगारांनाच लाभ मिळणार असल्याने यावर्षी या योजनेचा लाभ मर्यादित कामगारांनाच मिळण्याची शक्यता आहे.

नोंदणी वाढण्यासाठी संसारोपयोगी भांडी संचही देणार

दरम्यान, राज्यात दहा लाखांवर घरेलू कामगार आहेत. यापैकी 5 लाखांवर कामगारांचीच नोंदणी आहे. यापैकी दरवर्षी नूतनीकरण करण्याची संख्या ही अवघी 15 हजारांवर आहे. ही नोंदणी वाढावी, घरेलू कामगारांना विविध योजनांचा लाभ मिळावा, याकरिता 15 फेब—ुवारी 2024 पूर्वी नोंदणी असलेल्या घरेलू कामगारांना बांधकाम कामगारांना बांधकाम साहित्याचा संच देण्यात येतो, त्या धर्तीवर संसारोपयोगी साहित्याचा संच भेट देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याचेही वाटप तत्काळ करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news