नवी दिल्ली; वृत्तसंस्था : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 'मन की बात' हा कार्यक्रम प्रचंड लोकप्रिय ठरला आहे. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट रोहतकने केलेल्या पाहणीनुसार, देशभरातील सुमारे शंभर कोटी लोक हा कार्यक्रम आवडीने ऐकतात, असे दिसून आले आहे. म्हणजेच एकूण लोकसंख्येच्या 80 ते 90 टक्के लोकांना या कार्यक्रमाबद्दल माहिती असल्याचे स्पष्ट झाले आहे.
'आयआयएम'चे संचालक धीरज शर्मा आणि प्रसार भारतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी गौरव द्विवेदी यांनी याबाबत सविस्तर माहिती दिली आहे.