ITR दाखल करण्याची शेवटची संधी, हुकल्यास तुरुंगात जावे लागेल !

ITR दाखल करण्याची शेवटची संधी, हुकल्यास तुरुंगात जावे लागेल !
Published on
Updated on

नवी दिल्‍ली ; पुढारी ऑनलाईन आर्थिक वर्ष 2020-21 (AY 2021-22) साठी ( ITR) आयकर रिटर्न भरण्याची अंतिम तारीख 31 डिसेंबर 2021 होती. आयकर विभागाच्या म्हणण्यानुसार, या तारखेपर्यंत ई-फायलिंग पोर्टलवर 5.89 कोटी आयकर रिटर्न भरले गेले आहेत. परंतु, ज्यांनी त्यांचे ( ITR) प्राप्तिकर रिटर्न भरले आहेत त्यांच्यापैकी तुम्ही नसल्यास, आता तुमच्यासाठी ते करण्याची शेवटची संधी आहे. त्यानंतर तुम्ही तुरुंगातही जाऊ शकता. हे टाळण्यासाठी तुम्ही ३१ मार्चपर्यंत तुमचे आयकर रिटर्न भरले पाहिजे.

जर तुम्ही अद्याप ITR भरला नसेल, तर आता तुमच्याकडे 31 मार्च 2022 पर्यंत वेळ आहे. या तारखेपर्यंत तुम्ही ते भरू शकता. मात्र, यासाठी तुम्हाला दंडही भरावा लागेल. ITR उशीरा भरल्यास दंड आकारला जातो. यासंदर्भात कर तज्ज्ञांनी सांगितले की, जर एखाद्या व्यक्तीचे उत्पन्न पाच लाखांपेक्षा जास्त असेल, तर तो उशीरा आयटीआर भरू शकतो. मात्र, यासाठी तुम्हाला दंडही भरावा लागेल. 5000 रुपये दंड भरावा लागेल.

मात्र, अशा लोकांना थोडा दिलासा आहे, ज्यांचे उत्पन्न 5 लाख रुपयांपेक्षा कमी आहे त्यांना थोडा दिलासा मिळाला आहे. ज्‍यांचे उत्पन्न ५ लाखांपेक्षा कमी आहे. बळवंत जैन यांनी सांगितले की, पाच लाख रुपयांपेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्यांना दंड भरावा लागतो. मात्र ते 5 हजार रुपये नसून केवळ एक हजार रुपये आहे. आता यानुसार, इन्कम टॅक्स रिटर्न उशिरा भरल्यास तुम्हाला किती दंड भरावा लागेल हे समजू शकता. परंतु, ३१ मार्चपर्यंत आयकर विवरणपत्र भरले नाही, तर त्रास वाढू शकतो.

या विषयातील तज्ज्ञ म्हणाले, '31 मार्च २०२2 पर्यंत आयटीआर पेनल्‍टी 2 पर्यंतही ITR न भरल्‍यास प्राप्तिकर विभागाकडून त्या व्यक्‍तीला कराच्या ५० टक्के इतका दंड आकारला जाऊ शकतो. ज्या व्यक्तीला आयटीआर भरणे टाळून लपवायचे किंवा वाचवायचे होते. याशिवाय त्या व्यक्तीला तुरुंगातही टाकले जाऊ शकते, असे ते म्हणाले.

तज्ज्ञांच्या मते, 'याबद्दल फार कमी लोकांना माहिती आहे की, आयकर रिटर्न न भरणाऱ्या व्यक्तीवर कारवाई करण्याचा अधिकार सरकारलाही आहे. अशा परिस्थितीत जर शेवटच्या तारखेपर्यंत आयटीआर भरला नाही, तर त्या व्यक्तीला तुरुंगातही पाठवले जाऊ शकते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news