Ladakh glaciers : लडाखमधील दोन हिमनद्या मागे सरकल्या! शास्त्रज्ञांनी दिला इशारा

ladakh glacries 1
ladakh glacries 1
Published on
Updated on

पुढारी ऑनलाइन डेस्क : Ladakh glaciers : भौगोलिक आणि हवामान शास्त्रीयदृष्ट्या लडाख हे संवेदनशील क्षेत्र आहे. अशातच लडाखमीळ दोन हिमनद्या दुरंग ड्रंग आणि पेनसिलुंगपा या मागे सरकत असल्याचे शास्त्रज्ञांनी म्हटले आहे. या दोन्ही नद्या 1971 ते 2019 या काळात अनुक्रमे 7.8 चौरस किमी आणि 1.5 चौरस किमीने मागे सरकल्या आहेत. याबाबत चिंता व्यक्त करत शास्त्रज्ञांनी हिमनद्या वितळण्यासाठी वातावरणातील बदलासह अन्य अनेक घटकांना जबाबदार मानले आहे.

वाडिया इन्स्टिट्यूट ऑफ हिमालयन जिऑलॉजी (WIHG) चे शास्त्रज्ञ मनीष मेथा, विनित कुमार, पंकज कुनमार आणि कलाचंद सैन यांनी लिहिलेले निष्कर्ष नुकतेच 'सस्टेनेबिलिटी' या आंतरराष्ट्रीय, पीअर-रिव्ह्यू जर्नलमध्ये प्रकाशित झाले आहेत. टाइम्स ऑफ इंडियाने याबाबतचे वृत्त दिले आहे.

विशेष म्हणजे वांगचूक यांच्या नेतृत्वात लडाखमधील दोन तृतीयांश हिमनद्या वितळल्याने संवेदनशील क्षेत्राची जपणूक व्हावी म्हणून आंदोलन करण्यात आले होते. त्यानंतर अवघ्या काही आठवड्यातच हा अहवाल आला आहे.

अहवालात म्हटले आहे, Ladakh glaciers : लडाखमधील 14,612 फूट उंचीवर पेन्सी-ला खिंडीत हिमनद्या आहेत. DDG हिमनदी ७२ वर्ग किमी पसरलेली आहे. त्याने 7.8sqkm बर्फ गमावला आहे, जो त्याच्या एकूण पृष्ठभागाच्या 10% आहे. PG, 16sqkm मध्ये पसरलेल्या लहान हिमनद्याने 1.5sqkm कमी केले आहे, जे त्याच्या एकूण क्षेत्रफळाच्या 8% आहे. अभ्यासानुसार, DDG 1971 ते 2019 पर्यंत दरवर्षी 13 मीटर आणि पीजी वार्षिक 5.6 मीटर मागे गेला.

या अभ्यासाचे प्रमुख लेखक मनीष मेथा म्हणाले, केवळ हवामानातील बदलामुळेच हिमनद्या Ladakh glaciers प्रभावित होत नाहीत. तर हिमनद्यांच्या 'टोपोग्राफिक सेटिंग आणि मॉर्फोलॉजी'मुळे देखील प्रभावित होतात. या दोन्ही हिमनद्या एकाच भौगोलिक परिस्थितीत स्थित आहेत. त्या एकसारख्या हवामान परिस्थितीचा सामना करत आहेत, तरीही दोघींचे क्षेत्र वेगवेगळ्या पद्धतीने मागे सरकले आहे. यावरून असे म्हणता येऊ शकते की हिमनद्यांवर वेगवेगळे घटक प्रभाव टाकतात. स्नॉट भूमिती, हिमनदीचा आकार, उंची श्रेणी, उतार, पैलू, मोडतोड आवरण तसेच सुप्रा आणि प्रोग्लेशियल तलावांची उपस्थिती अभ्यासलेल्या हिमनद्यांच्या विषम प्रतिसादावर परिणाम करत आहे, असे म्हटले आहे."

Ladakh glaciers : एका हिमनदीची रुपरेषा कमी वेगाने मागे पडत असली तरी या दोन्ही हिमनद्या वितळणे चिंताजनक आहे. पर्यावरण वाद्यांच्या मते झांस्कर नदीच्या प्रवाहात या दोन्ही हिमनद्यांचा मोठा वाटा आहे. DDG हे झंस्करची सर्वात मोठी उपनदी डोडाचे उगमस्थान आहे, तर पीजी हे सुरु नदीचे उगमस्थान आहे.

लडाखमध्ये हवामान कार्यकर्ते अभियंता आणि संशोधक सोनम वांगचुक यांनी लडाखच्या अनियमित झालेल्या तापमानामुळे लडाखच्या भौगोलिक परिस्थितीवर होत असलेला परिणाम पाहून 26 जानेवारीपासून पाच दिवसांचे उपोषण केले होते. यावेळी त्यांनी लडाखमध्ये 'ऑल इज नॉट वेल' असे म्हटले होते. तसेच लडाखमधील पर्यटन आणि व्यावसायिक क्रियाकलापांमुळे केंद्रशासित प्रदेशातील दोन तृतीयांश हिमनद्या Ladakh glaciers वितळल्या आहेत. ज्यामुळे जलस्रोतांचा -हास होईल असे स्पष्ट करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना या संवेदनशील क्षेत्राचे रक्षण करण्याचे आवाहन केले होते. त्यानंतर काही दिवसातच शास्त्रज्ञांचा आलेला हा अहवाल लक्षवेधी ठरत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news