kurla Crime : बलात्कार केलेल्या तरूणीचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह सापडला, विश्वास नांगरे पाटील घटनास्थळी

kurla Crime : बलात्कार केलेल्या तरूणीचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह सापडला, विश्वास नांगरे पाटील घटनास्थळी
Published on
Updated on

कुर्ला : पुढारी वृत्तसेवा : साकीनाका येथे एका महिलेवर लैंगिक अत्याचार करून निर्घृण हत्येची घटना ताजी असतानाच आता मुंबई पुन्हा एकदा महिला अत्याचाराने हादरली आहे. कुर्ला येथील विनोबा भावे पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या कोहिनुर एचडीआयएल वसाहतीमध्ये वीस वर्षीय तरुणीची बलात्कार करून हत्या केल्याची घटना समोर आली आहे. (kurla Crime)

कुर्ला येथील एचडीआयएल या प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी तयार करण्यात आलेल्या प्रकल्पातील इमारती गेली दहा वर्षे बंद पडून आहेत. दरम्यान त्या ठिकाणी खंडर तयार झाले आहे.

यापैकी इमारत क्रमांक १६ सी या तेरा मजली इमारतीच्या गच्चीवर असलेल्या लिफ्ट रूम मध्ये अज्ञात वीस वर्षीय तरुणीचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला आहे.

(दि. २५) रोजी काही स्थानिक मुले व्हिडीओ बनविण्यासाठी या बंद इमारती मध्ये गेली होती. त्यांना यावेळी तरुणीचा मृतदेह दिसला.

kurla Crime : विश्वास नांगरे पाटील यांच्या सह वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव

याबाबतची माहिती स्थानिकांना आणि पोलीस नियंत्रण कक्षाला दिली. घटनास्थळी विनोबा भावेनगरमध्ये पोलीस दाखल झाले.

त्यांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनसाठी राजावाडी शवविच्छेदन गृहात पाठवला.

शवविच्छेदन प्राथमिक अहवालात या महिलेवर लैंगिक अत्याचार झाल्याचे समोर आले आहे.

त्याचबरोबर तिच्या डोक्यावर आणि अंगावर जखमा दिसून आल्या आहेत.

त्यामुळे या तरुणीवर लैंगिक अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आली असल्याचे स्पष्ट झाले आहे.

घटनेची माहिती मिळताच शनिवार (दि. २७) रोजी मुंबई पोलीस सह आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांच्या सह वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली आहे. सध्या विनोबा भावेनगर पोलीस ठाण्याची पाच पथके, आणि गुन्हे शाखा या मयत मुलीची ओळख पटविणे आणि तिच्या आरोपींचा शोध घेत आहे.

कायदा सुव्यवस्थेवर विरोधकांचे टीकास्त्र

मात्र या घटनेमुळे पुन्हा एकदा मुंबई पोलीस आणि राज्याची कायदा सुव्यवस्था यांच्या बाबत विरोधकांनी टीकास्त्र सुरू केले आहे.

शक्ती मिल त्यानंतर साकीनाका या घटना समोर आल्यानंतर खरे तर पोलिसांनी अश्या निर्जन स्थळी गस्त वाढवली आणि सुरक्षेचे उपाय केल्याचे सांगितले आहे.

या विभागात अश्या शेकडो पुनर्वसन च्या इमारती पडीक पडून आहेत.

मात्र तिथे लोकांचे पुनर्वसन तर होत नाहीच मात्र या इमारती आता महिला सुरक्षेच्या दृष्टीने धोकादायक झाल्या आहेत.

त्यामुळे आता पोलिसांसह प्रशासन देखील या अश्या इमारतींबाबत काय पावले उचलते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news