

पुढारी ऑनलाईन डेस्क : पंजाबमधील जालंधर येथे प्रसिद्ध कुल्हड पिझ्झा विकणाऱ्या एका कपलचा (Kulhad Pizza Couple) एमएमएस व्हिडिओ व्हायरल झाला. त्यानंतर दोघांची चर्चा होताना दिसली. कुल्हड पिझ्झा विकणाऱ्या कपलचे नाव आहे-सहज अरोडा आणि गुरप्रीत कौर. या कपलचा कुल्हड पिझ्झा ही युनिक डिश आहे. दरम्यान, या कपलचा एक एमएमएस व्हायरल झाला, ज्यामुळे या कपलनी पोलिसात धाव घेतली. याप्रकरणी एफआयआर दाखल करण्यात आले आहे. (Kulhad Pizza Couple)
सहज – गुरप्रीत दोघे कुल्हड पिझ्झा बनवून त्याची विक्री करतात. एका फूड ब्लॉगरने त्यांचा व्हिडिओ करून पोस्ट केला. सोशल मीडियावर ते इतके व्हायरल झाले की, पिज्जाची विक्रीदेखील वाढली. तेव्हापासून हे कपल प्रसिद्ध झाले होते. दरम्यान, कुल्हड पिझ्झा कपलचा एक खासगी व्हिडिओ व्हायरल झाला होता. हा खासगी व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर कपल ट्रोल झाले. लोकांनी खूप वाईट कामेंट्सदेखील केले.
खासगी एमएमएस व्हायरल झाल्यानंतर सहज अरोडाने पोलिसात तक्रार दाखल केली. आपल्या तक्रारीत तो म्हणाला, हा फेक व्हिडिओ आहे. तो व्हिडिओ AI जनरेट असल्याचा दावा त्याने केला. सहज अरोडाने एका महिला आणि ब्लॉगरवर गंभीर आरोप केले आहेत. ज्या महिलेवर आरोप करण्यात आला आहे, पोलिसांनी तिला बोलावले आहे. सहजचा आरोप आहे की, ही महिला एका ब्लॉगरच्या मदतीने कपलला ब्लॅकमेल करत होती.
मीडिया रिपोर्टनुसार, जालंधर पोलिसांनी ब्लॅकमेल करणाऱ्या महिलेला अटक केली आहे. ही महिला पिझ्झा शॉपमध्ये काम करत होती. तिला नोकरीवरून काढण्यात आले होते. तिने या व्हिडिओसाठी २० हजार रुपयांची खंडणी मागितली होती.