

पुढारी ऑनलाईन डेस्क : कोल्हापूर अर्बन बँकेच्या पंचवर्षिक निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आहे. या निवडणुकीत शिंदे-कणेरकर पॅनलने एकतर्फी विजय मिळवत सर्वच 15 जागा जिंकल्या. मतमोजणीच्या सुरूवातीपासून शिरीष कणेरकर यांचे पॅनल आघाडीवर होते. आणि ही आघाडी कायत ठेवत शिंदे-कणेरकर पॅनल विजयी झाले.
धडाकेबाज प्रचारामुळे गाजलेल्या आणि कोल्हापूर जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या कोल्हापूर अर्बन बँकेच्या निवडणुकीत सत्ताधारी कणेरकर-शिंदे पॅनेलने बाजी मारली. १५पैकी १५ जागा जिंकत बँकेवरील वर्चस्व कायम राखले. विरोधी संस्थापक पॅनलचे प्रमुख व विद्यमान संचालक उमेश निगडे, गीतादेवी जाधव यांनाही पराभवाची नामुष्की पत्करावी लागली. सत्तारुढ जुने पॅनलने एकतर्फी विजय मिळवताना चार हजारांहून अधिक मताधिक्य घेतले.
आरोप-प्रत्यारोप आणि जोरदार प्रचारामूळे दि कोल्हापूर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक निवडणुकीत सत्ताधारी पॅनेलचा विजयी झाले. या पॅनेलने 15 पैकी 15 जागा जिंकत आपली सत्ता कायम केली. सत्तारुढ पॅनलने एकतर्फी विजय मिळवत चार हजारांहून अधिक मते मिळवले.
रमणमळा येथील शासकीय गोदामात मंगळवारी मतमोजणी करण्यात आली. या निवडणूकीचे 15 जागांसाठी 52 केंद्रावर रविवारी 13 हजार 791 मतदान झाले. दरम्यान गेल्या निवडणूकीपेक्षा या निवडणूकीत 8 टक्के मतदान जास्त झाले आहे. या निवडणुकीत ४८ टक्के मतदान झाले होते.
मतदानाचा वाढीव टक्का कोणाच्या बाजूने झुकणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते. मात्र सभासदाने सत्ताधारी जुने पॅनेललाच पुन्हा एकदा पसंती दिली. रमणमळा येथील बहूउद्देशीय सभागृहात मतमोजणी झाली. सकाळी आठ वाजता मतमोजणीला प्रारंभ झाला. पहिला फेरीपासून सत्ताधारी जुने पॅनल आघाडीवर राहिले शेवटपर्यंत ही आघाडी कायम राहिली. बँकेचे माजी अध्यक्ष शिरीष कणेरकर यांच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब झाले. पाच अपक्ष उमेदवार होते, त्यांचा दारुण पराभव झाला.
सत्ताधारी पॅनलचे विजयी उमेदवार व कंसात प्राप्त मते :
शिरीष कनेरकर ( ८८१५ ), संभाजी जगदाळे ( ७७५६ ), रवींद्र धर्माधिकारी ( ७६३७ ), राजन भोसले ( ८१६६ ), नंदकिशोर मकोटे (७५०३) , जयसिंग माने ( ८०३२ ), अभिजीत मांगोरे (७९५५) , प्रशांत शिंदे ( ८२१६) , मधुसूदन सावंत (७७०१ ) यशवंतराव साळोखे ( ७५०२ ), विश्वास काटकर ( ८७९३ ), संध्या घोटणे ( ८२३७ ) , सुनीता राऊत ( ८४२३ ), नामदेव कांबळे ( ८५२१) , सुभाष भांबुरे (८९३९).
निवडणूक निर्णय अधिकारी अमर शिंदे, अधिक्षक उदय उलपे यांच्या मार्गदर्शनाखाली ४० टेबलांवर मतमोजणी झाली.