Panhala Leopard Attack : पन्हाळ्यात बिबट्या बंगल्यात शिरला अन् थेट कुत्र्यावर हल्ला केला; थरार सीसीटीव्हीत कैद

Panhala Leopard Attack : पन्हाळ्यात बिबट्या बंगल्यात शिरला अन् थेट कुत्र्यावर हल्ला केला; थरार सीसीटीव्हीत कैद
Published on: 
Updated on: 

पन्हाळा; पुढारी वृत्तसेवा : पन्हाळ्यात बिबट्याची दहशत निर्माण झाल्याने गावकरी धास्तावले आहेत. येथील राजाच्या झोपडी नावाच्या बंगल्यात शनिवार (दि.८) रात्री बिबट्याने दोन पाळीव कुत्र्यांवर हल्ला केला. डॉ.राज होळकर यांच्या बंगल्यासमोर हा प्रकार घडला आहे. बिबट्याने केलेला हा हल्ला सीसीटीव्हीत कैद झाला आहे.

याबाबत माहिती देताना डॉ. होळकर म्हणाले की, त्यांच्या राजाची झोपडी या बंगल्यात रात्री दीड वाजण्याच्या सुमारास बिबट्या शिरला. यावेळी बंगल्याच्या व्हरांड्यात पाळलेली दोन कुत्री होती. या कुत्र्यांवर बिबट्याने झडप घातली. मात्र कुत्र्याने प्रतिकार केला व भुंकायला सुरवात केल्याने ते जागे झाले व त्यांनी आवारातील लाईट लावल्या. त्यामुळे बिबट्या उडी मारून पळून गेला. बिबट्याच्या पाठोपाठ दुसरे कुत्रे त्याचा पाठलाग करत गेले. मात्र हे कुत्रे परत आले नसल्याचे होळकर यांनी सांगितले. आत्तापर्यंत त्या कुत्र्यांवर बिबट्याने चार वेळा हल्ला केला असल्याचेही डॉ. होळकर यांनी सांगितले. बिबट्याचा हा थरार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. याबाबत वन विभागाच्या अधिकाऱ्यांना माहिती देण्यात आली आहे. दरम्यान, पन्हाळ्यात बिबट्या असल्याचे या घटनेने स्पष्ट झाले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news