

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : भाऊसिंगजी रोडवरील डेंटल केअर अँड इम्प्लांट सेंटरचे उद्घाटन दैनिक 'पुढारी'चे चेअरमन व समूह संपादक डॉ. योगेश जाधव यांच्या हस्ते करण्यात आले.
रुट कॅनॉल, आर्थोडॉटिक्स ट्रिटमेंट, डेंटल इम्प्लांट, फुल माऊथ व पार्शियल डेंचर, अल्ट्रासोनिक स्केलिंग अँड पॉलिसिंग, फिक्स क्राऊन अँड ब्रिज, कॉसमॅटिक डेंटल ट्रिटमेंट, दात काढणे व स्माईल डिझायनिंग, लहान मुलांच्या दंतरोगावरील उपचार, अत्याधुनिक एक्स रे सिस्टीमद्वारे दंतरोगाचा अचूक निदान व उपचार तसेच मौखिक आरोग्य विषयावर या सेंटरमध्ये मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
डेंटल केअर अँड इम्प्लांट सेंटरचे डॉ. अभिषेक जगताप यांनी स्वागत केले. याप्रसंगी राजर्षी शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील कान, नाक, घसा विभागाचे प्रमुख डॉ. अजित लोकरे, डेंटल सर्जन डॉ. अशोक पाटील, भूलतज्ज्ञ डॉ. ए. बी. पाटील, डॉ. अभय पाटील, काँग्रेसचे करवीर तालुका शंकरराव पाटील, सेवा निवृत्त अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. हरिष जगताप आदी उपस्थित होते.