

पुढारी ऑनलाईन डेस्क
साऊथ फिल्म इंडस्ट्रीतील कलाकारांनाही कोरोनाचा फटका बसला आहे. मल्याळम चित्रपट स्टार मामूटी सुद्धा कोरोनाबाधित झाले आहेत. शनिवारी त्यांचा घसा दुखत होता, त्यानंतर त्यांची चाचणी झाली आणि ते पॉझिटिव्ह असल्याचे समोर आले. त्यांच्या २५ वर्षांच्या कारकिर्दीत त्यांनी ३८० हून अधिक चित्रपटांमध्ये शीर्ष अभिनेता म्हणून काम केले आहे. मामूटी यांना दक्षिणेतील अंबानी म्हटले जाते. मामूटी हा एक दिग्गज अभिनेते असण्यासोबतच वकील देखील आहेत.
मल्याळम चित्रपटांमधील दुहेरी भूमिकेसाठी मामूटी ओळखले जातात. जवळपास नऊ चित्रपटांमध्ये त्यांनी दुहेरी भूमिका केल्या आहेत. दाक्षिणात्य इंडस्ट्रीतील दोन मोठे स्टार मानले जाणारे मामूटी आणि कमल हासन यांनी कधीही चित्रपटात एकत्र काम केलेले नाही. मामूटी हे एकमेव मल्याळम अभिनेते आहेत ज्यांना तीनदा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. मामूट्टी यांना एकदा कायद्यात करिअर करायचे होते, म्हणून त्यांनी एर्नाकुलम लॉ कॉलेजमधून एलएलबी केले.
मामूटी त्यांच्या अभिनयासोबतच लग्झरी जीवनशैलीसाठी ओळखले जातात. त्यांच्याकडे कोट्यवधींची संपत्ती आहे. मामूटी २१० कोटींचे मालक आहेत. मामूटी यांनी त्यांच्या कारसाठी स्वतंत्र गॅरेज बांधले आहे. बहुतेक ते स्वत: कार चालवण्यास प्राधान्य देतात. दक्षिणेतील ऑडी खरेदी करणारे मामूटी हे पहिले स्टार आहेत. त्यांच्या ताफ्यात३६९ कार आहेत.
ते अनेक ब्रँड्सचा अॅम्बेसेडर देखील आहेत, ज्यातून त्यांची बक्कळ कमाई होते. मामूटी ज्या बंगल्यात राहतात त्याची किंमत चार कोटींहून अधिक आहे. मामूट्टी यांच्याकडे आयशरचा एक कारवाँही आहे, ज्यात त्यांनी बदल केला आहे. मामूट्टी यांच्या कुटुंबाविषयी सांगायचे तर, त्यांनी १९७९ मध्ये सल्फतशी लग्न केले. त्यांना दोन मुले आहेत
हे ही वाचलं का ?