दोन महिन्यांतच सुष्मिता सेन आणि ललित मोदी यांच्या नात्यात दुरावा? एका गोष्टीमुळे चर्चा

दोन महिन्यांतच सुष्मिता सेन आणि ललित मोदी यांच्या नात्यात दुरावा? एका गोष्टीमुळे चर्चा
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन : बॉलिवूड अभिनेत्री सुष्मिता सेन आणि आयपीएलचे संस्थापक ललित मोदी यांच्या प्रेमकहाणीच्या चर्चा थांबत नाहीत तोच आता आणखी एक अपडेट समोर आली आहे. 15 जुलै रोजी ललित मोदी यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर आणि इंस्टाग्राम अकाऊंटवर घोषणा केली होती की, ते आणि सुष्मिता एकमेकांना डेट करत आहेत. ललित यांच्या या घोषणेनंतर जणू एकच खळबळ उडाली होती. सुष्मिता सेनला सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल करण्यात आले आणि ललित मोदींची खिल्लीही उडवण्यात आली. पण आता ललित आणि सुष्मिता यांच्यात काही सुरळीत नसल्याचे दिसून येत आहे.

ललित मोदींनी सुष्मिता सेनसोबतचा डीपी काढला

खरं तर, आपल्या नात्याची घोषणा करताना ललित मोदींनी आपल्या इन्स्टाग्रामवर सुष्मितासोबतचा डीपी टाकला होता. तसेच त्यांच्या बायोमध्ये सुष्मितावरचे प्रेम व्यक्त करताना त्यांनी त्यात पार्टनर विथ क्राईम असे म्हटले होते. पण, आता दोन महिन्यांतच ललित मोदीने त्यांचा आणि सुष्मिताचा डीपी त्याच्या इंस्टाग्रामवरून काढून टाकत स्वतःचा एकट्याचा फोटो टाकला आहे. इतकेच नाही तर ललित मोदींनी आपल्या बायोमधून सुष्मिताचे नावही काढून टाकले आहे, ज्यानंतर दोघांमध्ये काही दुरावा निर्माण झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, ललित मोदींनी सुष्मितासोबत पोस्ट केलेले फोटो हटवलेले नाहीत.

ललित मोदींपूर्वी सुष्मिता सेन रोहमन शॉलला डेट करत होती. चाहत्यांनाही दोघांची जोडी खूप आवडली. त्यामुळे जेव्हा सुष्मिताने रोहमनसोबत ब्रेकअपची घोषणा केली तेव्हा चाहत्यांना हळहळ वाटली. मात्र, ब्रेकअपनंतरही सुष आणि रोहमनमध्ये चांगली मैत्री आहे. दोघे आजही अनेकदा एकत्र दिसतात. नुकताच सुष्मिताने तिची मुलगी रिनीचा वाढदिवस साजरा केला. यावेळी त्यांच्यासोबत रोहमनही दिसला होता.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news